स्‍कोडा ऑटो इंडियाकडून नवोन्‍मेष्‍कारी एनीटाइम वॉरंटी पॅकेज लॉन्‍च*

.

*स्‍कोडा ऑटो इंडियाकडून नवोन्‍मेष्‍कारी एनीटाइम वॉरंटी पॅकेज लॉन्‍च*

विक्रीच्‍या संदर्भात २०२२ ला सर्वात मोठे वर्ष म्‍हणून संपादित केल्‍यानंतर स्‍कोडा ऑटो इंडिया आपल्‍या पहिल्‍या सादरीकरणासह २०२३ चा शुभारंभ करत आहे. नवीन कार नाही, तर नवीन, क्रांतिकारी, ग्राहक उपक्रम, ज्‍याचा मालकीहक्‍क अनुभव व ग्राहक समाधान वाढवण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम आहे एनीटाइम वॉरंटी, ज्‍यामध्‍ये १ वर्ष/२०,००० किमी वॉरंटी पॅकेज आहे, जे कोणत्‍याही विद्यमान प्रमाणित किंवा विस्‍तारित वॉरंटीज वाढवण्‍यासाठी वापरता येऊ शकते.

स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्‍ड संचालक पीटर सोलक म्‍हणाले, ‘‘स्‍कोडा ऑटो इंडियासाठी पुढील मार्ग फक्‍त नवीन कार्स असणार नाही, तर ग्राहकांना अद्वितीय मालकीहक्‍क व देखभाल अनुभव देणारे विविध नवोन्‍मेष्‍कारी उपक्रम सादर करत आम्‍ही २०२३ ची सुरूवात केली. एनीटाइम वॉरंटी ही अशीच एक ऑफरिंग आहे, जी अॅक्‍सेलरेटिंग ग्रोथप्रती आमच्‍या मार्गात ग्राहक समाधान व त्रास-मुक्‍त मालकीहक्‍क अनुभवाच्‍या आमच्‍या कटिबद्धतेचे पालन करते.’’
स्‍कोडा ऑटो इंडिया ४-वर्षे/१००,००० किमी प्रमाणित वॉरंटीसह भारतीय ऑटोमोटिव्‍ह बाजारपेठेत अग्रस्‍थानी आहे, जेथे उद्योगामध्‍ये प्रमाणित वॉरंटी ३-वर्षे/७५,००० किमी आहे. तसेच स्‍कोडाने आपल्‍या पीस ऑफ माइंड उपक्रमांतर्गत ४-वर्षांची प्रमाणित वॉरंटी ५व्‍या व ६व्‍या वर्षांपर्यंत/१५०,००० किमीपर्यंतत वाढवण्‍याचा पर्याय दिला. नवीन एनीटाइम वॉरंटी विद्यमान प्रमाणित व विस्‍तारित वॉरंटीजमध्‍ये भर आहे आणि ग्राहकांना जवळपास ८ वर्षे/१५०,००० किमी (जे पहिले असेल ते) चे अतिरिक्‍त वॉरंटी कव्‍हरेज देते.

एनीटाइम वॉरंटी विशेषत: कोडियक (टीडीआय), सुपर्ब, ऑक्‍टाव्हिया, येटी व रॅपिडच्‍या जुन्‍या पिढ्यांकरिता १-वर्ष/२०,००० किमी कालावधीसाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. ७ वर्षांच्‍या आतील आणि/किंवा १३०,००० किमीपेक्षा कमी मायलेज असलेली कोणतीही स्‍कोडा तपासणी व सर्टिफिकेशननंतर एनीटाइम वॉरंटीसाठी पात्र आहे. प्रमाणित, विस्‍तारित किंवा एनीटाइम वॉरंटी यापैकी कोणतीही वॉरंटी पुढील मालकाला हस्‍तांतरणीय आहे. विद्यमान वॉरंटी संपलेले ग्राहक देखील एनीटाइम वॉरंटी खरेदी करू शकतात, पण त्‍यासाठी कारने तपासणी मानकांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

२०२२ मध्‍ये स्‍कोडो ऑटो इंडियाने ग्राहक टचपॉइण्‍ट्सची संख्‍या २०२१ च्‍या शेवटी १७५ वरून २४० पेक्षा अधिकपर्यंत नेली. कंपनीने स्‍थानिकीकरणाच्‍या उच्‍च पातळ्यांच्‍या माध्‍यमातून देखभाल खर्च जवळपास २१ टक्‍क्‍यांनी कमी केला.

एनीटाइम वॉरंटी ग्राहकांना समाधान आणि त्रासमुक्‍त देखभाल व मालकीहक्‍क अनुभव देण्‍यासाठी उत्‍पादकाच्‍या ग्राहक-केंद्रित प्रयत्‍नाच्‍या दिशेने आणखी एक पाऊल आहे.
वर्ष २०२२ मध्‍ये स्‍कोडा ऑटो इंडियाने विक्रीच्‍या संदर्भात सर्वात मोठ्या वर्षाची नोंद केली. भारत स्‍कोडा ऑटोसाठी जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आणि युरोपबाहेरील सर्वात मोठी बाजारपेठ बनली. कंपनीसाठी सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे इंडिया २.० प्रकल्‍पांतर्गत पहिले उत्‍पादन, मेड-फॉर-इंडिया, रेडी-फॉर-द-वर्ल्‍ड एमक्‍यूबी-एओ-इन स्‍कोडा कुशकने ग्‍लोबल एनसीएपी क्रॅश टेस्‍ट्समध्‍ये संपूर्ण ५-स्‍टार्स मिळवले, ते देखील प्रौढ व मुले प्रवाशांसाठी नवीन, अधिक खडतर टेस्‍ट प्रोटोकॉल्‍स अंतर्गत मिळवले. चार महिन्‍यांनंतर आणि इतर चाचणी करण्‍यात आलेल्‍या कार्ससह कुशक सुरक्षिततेच्‍या चार्टवर अव्‍वलस्‍थानावर कायम आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar