अधिक प्रगत होंडा अॅक्टिव्हा २०२३ गोव्यात विक्रीसाठी उपलब्ध

.

अधिक प्रगत होंडा अॅक्टिव्हा २०२३ गोव्यात विक्रीसाठी उपलब्ध,
पणजी, दि. ७ – होंडा मोटरसायकल अॅंड स्कूटर इंडियाने निर्मिलेली अधिक प्रगत होंडा अॅक्टिव्हा २०२३ गोव्यात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. स्टॅंडर्ड, डिलक्स व स्मार्ट अशा तीन व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध असलेली ही दुचाकी आता ग्राहकांवर राज्य करेल हे निश्चित आहे. एचएमएसआयचे पहिले ओबीडी-२ चे पालन करणारे निकष या स्कूटरमध्ये सामावलेले आहेत.
गेली दोन शतके होंडा अधिक प्रगत होंडा अॅक्टिव्हा लोकप्रिय स्कूटर म्हणून प्रसिद्ध आहे व आता ग्राहकांच्या विविध मागण्या पूर्ण करणारी ही गाडी इतिहास निर्माण करण्यास सज्ज झाली आहे. तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या होंडा अॅक्टिव्हामध्ये स्मार्ट शक्ती तंत्रज्ञान, इंधन भरण्यासाठी मागच्या बाजूला ओपनिंग व काम्बो ब्रेक सिस्टीमचा समावेश आहेच पण त्याशिवाय स्मार्ट की हे नवीन वैशिष्ट आहे. यामुळे बाजारात गर्दीच्या ठिकाणी उभी केलेली तुमची गाडी शोधण्यास सुलभ होईल. चावीवरचे बटन दाबल्यावर गाडीचे चारही साईड लाईट्स दोनदा उघडझाप करतील व गाडी शोधायला मदत होईल. तसेच त्यातील स्मार्ट अनलाॅक वैशिष्ट्यामुळे चावी गाडीला न लावताच हॅंडल अनलाॅक वा लाॅक करता येईल. अक्टिव्हेशननंतर जर २० सेकंदात काहीही क्रिया झाली नाहीतर स्कूटर स्वयंचलितपणे डी अक्टिव्हेट होईल. त्याशिवाय स्मार्ट स्टार्ट वैशिष्ट्यामुळे वाहनापासून दोन मिटरच्या अंतरावरून चालक लाॅकमोडवरील खटका फिरवून ही गाडी चालू करू शकेल. गाडीचोरीला आळा घालण्यासाठी स्मार्ट सेफ या प्रणालीचा उपयोग होईल. चोराला त्याची चावी वापरून ही गाडी चालूच करता येणार नाही, अशी योजना या होंडा अॅक्टिव्हा २०२३ मध्ये करण्यात आली आहे.
त्यावर बसवलेले एक बटन खाली केल्यावर गाडी चालू होईल व वते वर केल्यावर गाडी त्वरित बंद होईल. या होंडा अॅक्टिव्हामध्ये वैशिष्टपूर्ण डबल लीड फ्युएल ओपनिंग सिस्टीम आहे ज्यामुळे गाडीच्या सीटखाली १८ लिटर्सची विस्तृत जागा तयार झाली आहे ज्यात बऱ्याच गोष्टी सहजपणे ठेवता येतील व एकाच कुलुपात ५ असा लॅक मोड आहे ज्यामुळे चालकास जास्त सुलभता व विश्वासार्हता मिळेल. चालकाच्या पाय ठेवण्याची जागा रुंद असल्याने गाडी चालवणे आरामदायी आहेच पण त्याबरोबरच तिथे सामान ठेवणे शक्य आहे. लांब व्हीलबेस व टेलिस्कोपिक सस्पेंशन असल्याने खडबडीत रस्त्यांवर गाडी चालवणे आरामदायी होईल. डीसी लेड हेडलॅंप अधिक चांगला प्रकाश देईल व त्याच हाय बीम व लो बीम आणि सिग्नल देण्याची सोय आहे. या वैशिष्ट्यांसोबतच एकमात्र होंडा एजीजी स्टार्टर बसवल्याने गाडी पटकन चालू होते व कसलीही खरखर वा आवाज होत नाही. डीकाम्प्रेशन तंत्रज्ञानाचा व स्वींग बॅक फिचरचा वापर केल्याने कमी शकत् वापरून गाडी चालू होते. यातील स्मार्ट सोलेनाईड फीचरमुळे हवा व इंधनाचे मिश्रण योग्य होते. प्रोग्राम्ड फ्यूएल इंजेक्शन योजनेमुळे त्यातील ५ इंटेलिजंट सेन्सर्सकडून सतत फीडबॅक मिळतो व आवश्यक तेवढेच इंधन मिळते. होंडाने जगात पहिल्यांदाच टंबल फ्लो तंत्रज्ञानाचा वापर विकसित केला असून वाहनाची इंधन वापर क्षमता वाढवली आहे. फ्रिक्शन रिडक्शन तंत्रज्ञानाने इंजिनमधील घर्षण कमी झाले आहे व त्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढले आहे. व इंधनाचा वापर इतर गाड्यांपेक्षा कमी झाल्याने मायलेजमध्ये फरक दिसून येतो.
होंडा अॅक्टिव्हा २०२३  ही गाडी स्टॅंडर्ड, डिलक्स व स्मार्ट अशा तीन व्हेरिएंट्स मध्ये आणि सायरन ब्लू, डिसेंट ब्लू मेटॅलिक, रेबेल रेड मेटॅलिक, ब्लॅक, पर्ल प्रेशियस व्हाईट व मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक अशा पाच रंगात उपलब्ध आहे. स्टॅंडर्ड (७७,०९५), डिलक्स (७९,५९६) व स्मार्ट (८३,०९६) या किंमतीमध्ये (एक्स-शोरुम) गोव्यात उपलब्ध राहील, असे कंपनीने कळवले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar