जुनसवाडा – मांद्रे येथील डोंगर फोडप्रकरणी ग्रामपंचायतीने पाहणी करून कारवाई करावी, आणि निसर्गाचे नुकसान रोखावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रसाद शहापुरकर यांनी सरपंचांना

.

जुनसवाडा – मांद्रे येथील डोंगर फोडप्रकरणी ग्रामपंचायतीने पाहणी करून कारवाई करावी, आणि निसर्गाचे नुकसान रोखावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रसाद शहापुरकर यांनी सरपंचांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.
जुनसवाडा येथील आम्रपाली परिसरात गेले काही दिवस पत्र्यांच्या आडोशाखाली डोंगरफोड सुरू आहे. यामुळे डोंगरावरील झाडांची कत्तल केली आहे. उंचवटे तोडल्याने निसर्गाची हानी झाली आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे. मागील महिन्यात ग्रामसभेतही आम्रपालीतील प्रकल्पाचा विषय गाजला होता. नागरिकांनी यावर संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली होती. सरपंच अमित सावंत यांनी पंचायतीकडे लेखी तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. त्यास अनुसरून ॲड. प्रसाद शहापुरकर यांनी लेखी निवेदन दिले आहे. त्याच्या प्रती स्थानिक पंचायत सदस्य सौ. चेतना पेडणेकर, तालुका वन अधिकारी, उप नगर नियोजक, पेडणे तालुका यांनाही देण्यात आल्या आहेत. या निवेदनात त्यानी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याचिका क्र : १४/२० १६ या निवाड्यात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष झाले आहे या कडे लक्ष वेधले आहे .
सर्व संबंधितांनी डोंगरफोड प्रकरणी त्वरित कारवाई करावी आणि पंचायतीने काम स्थगित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही ॲड. शहापुरकर यांनी केली आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar