म्हापसा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विराज फडके यांची बिनविरोध निवड :अंत्यावेळी नगरसेवक

.

म्हापसा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विराज फडके यांची बिनविरोध निवड :अंत्यावेळी नगरसेवक नगरसेवक आनंद भाईडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला
म्हापसा (न. प्र.).:- म्हापसा पालिकेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदी विराज फडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी सत्ताधारी गटाकडून विराज फडके तर विरोधी गटाकडून आनंद भाईडकर यानी मिळून दोन उमेदवारी अर्ज काल मंगळवारी दि १४ रोजी पालिकामुख्याधिकारी अमितेश सावईकर यांच्याकडे दाखल केले होते.
आज बुधवार दि १५ रोजी सकाळी ११ वाजता पालिका सभागृहात बार्देश तालुका उपजिल्हाधिकारी गुरूदास देसाई यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली. दोन अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी देसाई यानी दोघांपैकी एका उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटाचा अवधी दिला. यावेळी नगरसेवक आनंद भाईडकर यानी आपली उमेदवारी मागे घेतल्याने सत्ताधारी गटातील नगरसेवक विराज फडके यांची उपनगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई आणि जाहीर केले.त्यांना म्हापसा पालिका मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी सहकार्य केले.
यावेळी पत्रकारांकडे बोलताना नवनिर्वाचित म्हापसा पालिका उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी सांगितले की म्हापसा पालिकेचा विकास लवकरात लवकर होण्यासाठी आपण पाऊल उचलणार आहे.त्याचप्रमाणे अडून राहिलेली विकास कामे चालीस लावण्याकडे आपला प्रामाणिकपणे प्रयत्न असणार आहे.विसही प्रभागांना आपण समान दर्जा देण्यासाठी आपला प्रयत्न असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नव नवीन प्रकल्प शहरासाठी आणण्याकडे आपला संकल्प असल्याचेही आश्वासन दिले.
दरम्यान विरोधी गटातील नगरसेवकअँड शशांक नार्वेकर,सुधीर कांदोळकर,कमल डिसोझा,अन्वी कोरगावकर तारक आरोलकर, यांनी आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की ही लोकशाही प्रमाणे निवडणुका झाले नाही कोणतीही निवडणूक गुप्त मतदानाने होणे आवश्यक असताना हात वर करून निवडणूक करणे हे योग्य नव्हे त्याचप्रमाणे सगळ्याच निवडणुका या हात वर करूनच का होत नाहीत असाही त्यांनी सवाल केला आणि यापुढे अशा ज्या निवडणुका असतात त्या गुप्त मतदानाद्वारे झाल्या पाहिजेत असेही त्यांनी आपले मत व्यक्त केले.
चौकट
नगरसेवक आनंद भाईडकर यांना पत्रकारांनी शेडले असता त्यांनी सांगितले की म्हापसा शहराचा विकास आहे तो सर्वानुमते झाला पाहिजे त्याच्यात खो येऊ नये म्हणून आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे ते म्हणाले आपण उमेदवारी अर्ज दाखल केला होता. म्हापसा शहराच्या विकासासाठी आम्ही सगळे नगरसेवक एकत्र येऊन काम करण्यास तयार आहोत आपण कोणी त्यासाठी खो आणू नये उपनगराध्यक्षची निवड बिनविरोध झाली त्याबद्दल आपल्याला आनंद आहे आणि त्यांनी सर्वांना सहकार्य करावे असेही ते म्हणाले.
फोटो :-म्हापसा पालिकेच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विराज फडके यांचे स्वागत करताना नगरसेवक (छाया :-प्रणव फोटो )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar