म्हापसा वाताहार
कला व सांस्कृतिक क्षेत्रात सम्राट क्लब हळदोणा भरीव कार्य करीत असून प्रत्येक वर्षी पतंग महोत्सव आयोजित करीत असल्याबद्दल काकलार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी हळदोणा पंचायतीच्या उपसरपंच अभिज्ञा सातडैकर हिने गौरवदगार काढले
सम्राट क्लबची भरभरून प्रशंसा करीत आपण त्याच्या उपक्रमाना नेहमीच सहाय्य करीन असे आश्वासन तिने दिले.
खोरजुवे पौडवाल येथील श्री सातेरी मंदिराजवळील मैदानात आयोजित स्पर्धची सुरुवात सरपंच आश्विन डिसोझा यांच्या हस्ते गॅसचे फुगे आकाशात सोडून करण्यात आले. या स्पर्धत एकूण ५० जणांनी भाग घेतला होता. स्पर्धकांना मोफत पतंग व इतर सामान देण्यात आले. ४० मिनिटे चाललेल्या या स्पर्धेचे चित्र मनोरंजक व उत्सुकता वाढवणारे होते
यात बाल स्पर्धकाचा सहभाग अतिशय रोमांचकारी होता.
स्पर्धेचे पहिले बक्षीस प्रणव नाईक यांनी पटकावले. तसेच स्वत तयार केलेल्या पतंग साठीचे बक्षीस पण त्याला प्राप्त झाले. दुसरे बक्षीस रुषिकेश पोळे याला मिळाले. तर तिसरे बक्षीस तेजस साळगावकर याला मिळाले. स्वनील पोळे व राजेश पावसकर याना उतेजनाथ बक्षिसे देण्यात आली. क्लब ने घेतलेल्या कार्निव्हल गोठा सजावट स्पर्धात प्रथम क्रमांक सैंड्रा फेर्नांडिस् , दुसरे बक्षीस perpetual बोर्गेस व तिसरे बक्षीस जेनिफर विटोरि या याना प्राप्त झाले. विशेष अतिथी म्हणून अमरनाथ पणजीकर उपस्थित होते. क्लबचे कार्यक्रम संचालक प्रियदर्शन साळगावकर यांनी परीक्षण केले. अमित नाईक यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले. क्लबच्या अध्यक्षा मंगल हळदोणकर हिने प्रास्ताविक केले, रमाकांत अणवेकर यांनी सुत्रसंचालन केले. खजिनदार सिद्धी रायकर हीने आभार मानले. अमित शिंदे, सवैश रायकर, अमेय देसाई यांनी सहाय्य केले