संत सोहीरोबानाथ आंबिए महाविद्यालयत ‘श्रीफळाची कला’ या कार्यशाळेच्या सदस्याना प्रमाणपत्रांचे वितरण

.

संत सोहीरोबानाथ आंबिए महाविद्यालयत ‘श्रीफळाची कला’ या कार्यशाळेच्या सदस्याना प्रमाणपत्रांचे वितरण

कलात्मकता उदरनिर्वाहाचे साधन बनू शकते,कलात्मकतेचा वापर माणसाला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते असे उदगार पेडणेचे un उपजिल्हाधिकारी दीपक वांयगणकार यांनी काढलें.श्रीफळाची कला ही करवंटी व काथ्यापासून कलाकृती बनवण्याचा अल्पकालीन पाठ्यक्रम कार्यशाळेच्या समापन व प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.ही कार्यशाळा विर्नोडा पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अक्षयत्व व हरीत उपक्रम विभागाच्या संचालक डॉ.अमृता डिंगे व विस्तार कार्यक्रम विभागाच्या संचालक प्रा.प्रियांका परब ,यांनी उच्च शिक्षण संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती.ह्या कार्यशाळेत 23 प्रशिक्षार्थीना करवंटी व काथ्यापासून पंदरा प्रकाराच्या कलात्मक वस्तु बनवण्याचे प्रशिक्षण सोनू शेटगांवकर व विष्णू नाइक यांनी दिलें.तीस तासांची ही कार्यशाळा 25 नवेंम्बर ते 12 डिसेंबर या कालावधित घेण्यात आली होती.सुरवातीला डॉ अमृता डिंगे यांनी प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत केलें.प्रा.एड्रीयल गोम्स यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली.हर्षा नाइक यांनी निवेदन केले व समिक्षा नाइक यांनी आभार प्रदर्शन केलें.प्रा.प्रियांका परब आणि प्रा.मानसी धावुस्कार यांनी प्रमाणपत्र वितरणाचे संयोजन केले.ह्या प्रसंगी कार्यशाळेत भाग घेतलेल्याना हरीत उपक्रम विभागाच्या वतीने हाडजोड व ब्राह्मी यी औषधी वनस्पतींच्या रोपट्यांचे वाटप करण्यात आले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar