पणजी ः गोवा फुटबॉल विकास परिषदेने (जीएफडीसी) वाळपई येथे मुलींसाठीचे प्रशिक्षण केंद्र पूर्ण क्षमतेनिशी सोमवारी पुन्हा सुरू केले.
वाळपई परिसरातील जवळपास 50 मुलींनी प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी आपला सहभाग नोंदविला. व्हीएमसी मैदानावर जीएफडीसीचे अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकरप वाळपई फुटबॉल विकास केंद्राचे प्रमुख अब्दुल्ला खान, सल्लागार समिती सदस्य सय्यद सर्फराज, नासिर खान, इनुस आगा, नगिना खान व समरीन आगा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना साळगावकरचे माजी दिग्गज गोलरक्षक व अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंखवाळकर म्हणाले की, केंद्राच्या विकासाबद्दल खूप आनंद झाला आहे. यामुळे प्रशिक्षणार्थींना अधिक जोमाने खेळण्याची प्रेरणा मिळणार आहे. फुटबॉलमध्ये शिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळासह मुलींनी शिक्षणाकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही निष्ठेने खेळ केल्यास तुम्ही भविष्यातील स्टार होऊ शकता, असे पद्मश्री पुरस्कार विजेते शंखवाळकर म्हणाले. त्यांची पालकांचे आभार मानतानाच आपल्या पाल्यांना नियमितपणे केंद्रावर सरावासाठी, प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे आवाहन केले. दिग्गज फुटबॉलपटूंच्या पावलावर पाऊल टाकून मुलींनी स्वतःचे नाव चमकवताना राज्याचे व देशाचे नाव उंचावलेले पाहायला आवडेल, असे ते म्हणाले. या केंद्राला जीएफडीसीचा पूर्ण पाठिंबा लाभणार असून प्रशिक्षण सत्रांसाठी व्हीएमसी मैदान देण्याची विनंती स्थानिक आमदार व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना करणार असल्याचे शंखवाळकर म्हणाले.
जीएफडीसी वाळपई केंद्र पुन्हा सुरू पणजी ः गोवा फुटबॉल विकास परिषदेने (जीएफडीसी) वाळपई येथे मुलींसाठीचे प्रशिक्षण केंद्र पूर्ण क्षमतेनिशी सोमवारी पुन्हा सुरू केले. वाळपई परिसरातील जवळपास 50 मुलींनी प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी आपला सहभाग नोंदविला. व्हीएमसी मैदानावर जीएफडीसीचे अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकरप वाळपई फुटबॉल विकास केंद्राचे प्रमुख अब्दुल्ला खान, सल्लागार समिती सदस्य सय्यद सर्फराज, नासिर खान, इनुस आगा, नगिना खान व समरीन आगा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना साळगावकरचे माजी दिग्गज गोलरक्षक व अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंखवाळकर म्हणाले की, केंद्राच्या विकासाबद्दल खूप आनंद झाला आहे. यामुळे प्रशिक्षणार्थींना अधिक जोमाने खेळण्याची प्रेरणा मिळणार आहे. फुटबॉलमध्ये शिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळासह मुलींनी शिक्षणाकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही निष्ठेने खेळ केल्यास तुम्ही भविष्यातील स्टार होऊ शकता, असे पद्मश्री पुरस्कार विजेते शंखवाळकर म्हणाले. त्यांची पालकांचे आभार मानतानाच आपल्या पाल्यांना नियमितपणे केंद्रावर सरावासाठी, प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे आवाहन केले. दिग्गज फुटबॉलपटूंच्या पावलावर पाऊल टाकून मुलींनी स्वतःचे नाव चमकवताना राज्याचे व देशाचे नाव उंचावलेले पाहायला आवडेल, असे ते म्हणाले. या केंद्राला जीएफडीसीचा पूर्ण पाठिंबा लाभणार असून प्रशिक्षण सत्रांसाठी व्हीएमसी मैदान देण्याची विनंती स्थानिक आमदार व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना करणार असल्याचे शंखवाळकर म्हणाले.

.
[ays_slider id=1]