म्हापसा वाताहार
श्री.शांता विद्यालयात संगणक कार्यशाळा संपन्न
विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री. शांता
विद्यालयामध्ये विद्यार्थ्याना विविध विषयांचे सखोल ज्ञान अर्जित व्हावे या अनुशंगाने खास संगणक विषयावर आधारीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विषय तज्ञ म्हणून शाळेची माजी विद्यार्थीनी व संगणक अभियांत्रिक विद्यार्थीनी कु.सुयेशा गावकर उपस्थित होती.त्यांनी दुक श्राव्याच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी ,पॉवर पॉइंट याची विविध वैशिष्ट्ये ,उपयोग ,फायदे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढवण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल यावर प्रकाश टाकला .

या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ. प्रजिता सांगाळे उपस्थित होते तसेच शिक्षिका सौ. जागृती गावकर उपस्थित होत्या.