मणिपाल हॉस्पिटल गोवा तर्फे करण्यात आली मोठा सारकोमा काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया*

.

*मणिपाल हॉस्पिटल गोवा तर्फे करण्यात आली मोठा सारकोमा काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया*

७५ वर्षीय पुरुष रुग्णावर करण्यात आली दुर्मिळ अशी ट्युमर वरील शस्त्रक्रिया

गोवा, १५ फेब्रुवारी २०२३- मणिपाल हॉस्पिटल्स गोवा येथील सर्जन्स नी एक मोठा सारकोमा काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. सारकोमा म्हणजे जठराच्या मोठ्या मोकळ्या जागेत एक ॲब्डोमिनोपेल्व्हिक पेशींचा गाँठ तयार होतो, ७५ वर्षीय या रुग्णाच्या पोटात ३१ सेंमी चा आणि ३.२ किलोग्रॅम वजनाचा हा ट्यूमर यशस्वीपणे काढून टाकण्यात आला. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे या रुग्णाला पुर्नजन्म प्राप्त झाला आहे.

एका वयोवृध्द अशा पुरुष रुग्णावर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली, त्याच्या पोटात ३१ सेंमीचा व ३.२ किलोग्रॅम वजनाचा ट्यूमर होता. या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांच्या चमू मध्ये युरोलॉजिस्ट डॉ. माधव संझगिरी, सी.व्ही सर्जन डॉ. राकेश देशमाने, ऑन्कोसर्जन डॉ श्रीधरन् एम, प्लास्टिक सर्जन डॉ. अमेय पेडणेकर यांच्या सह ॲनेस्थेशिया केअर आणि एपिड्युरल एक्सपर्ट डॉ. एलिन रॉड्रीग्ज तसेच आयसीयू चमूचा समावेश होता.

या सर्जरी विषयी बोलतांना मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे युरोलॉजिस्ट डॉ. माधव संझगिरी यांनी सांगितले “ सारकोमाचे व्यवस्थापन करणे एक आव्हानात्मक गोष्ट असते आणि ते करत असतांना ‍विशेषज्ञांचा मोठा चमू काम करुन रुग्णासाठी सर्वोत्कृष्ट निष्कर्श प्राप्त करुन द्यावे लागतात. वयोवृध्दआणि विविध आजार असूनही या रुग्णावर आम्ही यशस्वीपणे रॅडिकल एक्सिशन करुन युरेटर पुर्नरचना करुन जखम बंद करु शकलो. आता रुग्ण हा कालानुरुप बरा होत असून एका आठवड्यानंतर रुग्णाला हॉस्पिटल मधून घरी पाठवण्यात आले आहे.”

या यशस्वी शस्त्रक्रिये विषयी बोलतांना मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे हॉस्पिटल डायरेक्टर श्री सुरेंद्र प्रसाद यांनी सांगितले “ अचूक निदान आणि उपचार देऊन रुग्णाला चांगली जीवनशैली दिल्या बद्दल मी संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो. मणिपाल हॉस्पिटल्स गोवा येथे उच्चशिक्षित सुपर स्पेशॅलिटी तज्ञ आहेत जे एकत्र येऊन वैज्ञानिक व शिस्तबध्द पध्दतीने अतिशय जटील शस्त्रक्रिया यशस्वी करत आहेत.”

या रुग्णाला आमच्या प्रशिक्षित तज्ञ नर्सिंग कर्मचार्‍यांकडून सहकार्य लाभले तसेच युरोलॉजी विभागतील सहकारी डॉ. जॅनेट रॉड्रीग्ज आणि डॉ. वेरिना लोबो यांनी सुध्दा सहकार्य केल्याचे श्री. प्रसाद यांनी नमूद केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें