छत्रपतींचा लढा हा अन्याविरुद्ध होता कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हता .

.

छत्रपतींचा लढा हा अन्याविरुद्ध होता कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हता .

न्यू इंग्लिश हायस्कूल केरीत शिवजयंती साजरी.

मावळयांची साथ आणि स्वतःच्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांचा लढा हा अन्यायाविरुद्ध होता तर तो कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हता असे प्रतिपादन न्यू इंग्लिश हायस्क्युल केरी पेडणेच्या
इतिहास शिक्षिका नीलम महालदार यांनी केरी येथे केले.

न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून महालदार यावेळी बोलत होत्या.

याप्रसंगी केरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नारायण सोपटे केरकर , पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष जयंती नार्वेकर, पालक शिक्षक संघाचे इतर कार्यकारी पदाधिकारी, ज्येष्ठ शिक्षक सत्यवान हर्जी, निषिता आकरकर, सर्वेश कोरगावकर, शर्मिला नाईक, गुरुप्रसाद तांडेल आणि शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर व्यासपीठावर उपग्स्थत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी पेटुल या कोकणी भाषा मंडळाने पेडणे सोयरोबानाथ आंबिये महाविद्यालयात आयोजित कायाक्रमात शाळेच्या मुलांनी सहभाग घेतलेला त्याबद्दल सर्व मुलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले.

यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध बहारदार पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचा पालक व विद्यार्थ्यांनी मनमुराद लाभ घेतला. तसेच पाचवीच्या मुलांनी सादर केल्या लेझीम नृत्याने सर्वांची वाहवा मिळवली.

महाराजांचा अभ्यास, व्यवस्थापन, नियोजन आणि कृतीशीलता यामुळे ते दूरदृष्टी रयतेचे स्वराज्य निर्माण करू शकले. आजघडीला जे कुकृत्य करतात, समाजविघातक काम करतात, स्त्रीला अपमानास्पद वागणूक देतात अशांचा आज घडीला अफझल खान व्हायला हवा, तस झालं तरच समाजाला योग्य शिकत लागणार
असे न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी शिखक गौरव किन्नरकर यांनी केले तर प्रशिक्षणार्थी गंधवी वस्त यांनी आभार मानले

फोटो
केरी पेडणे येथे शिवजयंतीनिमित्त पोवाडा सादर करताना न्यू इंगकिश हायस्कूलचे विद्यार्थी.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar