आजच्या पिढीला शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेण्याची व त्यांच्या विचारांवर चालण्याची खरी गरज

.

आजच्या पिढीला शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेण्याची व त्यांच्या विचारांवर चालण्याची खरी गरज आहे. आणि त्यासाठी शिवाजी महाराजांबद्दल जास्तीत जास्त वाचन करणे गरजेचे आहे. असे उद्गार विद्याभारती संचालित पीपल्स हायस्कूल कामुर्ली येथे प्रमुख पाहुणे म्हणून सचिन मदगै यांनी काढले ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे असे प्रत्येकाला वाटते. पण ते शेजारच्या घरी. कारण स्वतःवर संकट कोणालाही नको असतात पण कुठेतरी ही विचारसरणी बदलण्याची गरज आहे. आणि त्यासाठी नितांत वाचनाची गरज आहे .त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल भरपूर माहिती दिली व उपस्थितांना प्रेरित केले शिवजयंतीच्या निमित्ताने, विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यात श्री सातेरी शिशुवाटीकेच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा सादर केली. तर, सातेरी प्राथमिकच्या विभागाने नृत्य सादर केले .तसेच पीपल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. सांस्कृतिक कार्यक्रमाची सूत्रे कु.पूजा शेट्ये यांनी आपल्या हाती घेतली तर कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन श्री महेंद्र परब यांनी केले. शेवटी पूजा शेट्ये यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar