लीड विथ केअर कार्यक्रमाचा शुभारंभ

.

लीड विथ केअर कार्यक्रमाचा शुभारंभ
अपंगत्व आणि विशेष गरजा असलेल्या मुलांचे पालक असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार सर्वसमावेशक देखभालीचा आधार
पणजी:अपंगत्व आणि विशेष गरजा असलेल्या मुलांचे पालक असणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वंकष मदत देऊ करणाऱ्या ‘लीड विथ केअर’ या कार्यक्रमाची घोषणा प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडियाने केली. १ एप्रिल २०२३ पासून अंमलात येणारा हा कार्यक्रम मज्जासंस्थाविकासाशी संबंधित, ज्ञानेंद्रियांशी संबंधित, वर्तणूकीशी संबंधित किंवा शारीरिक अपंगत्वाशी संबंधित विशिष्ट आजारांनी ग्रस्त मुलांसाठी प्रारंभिक प्रतिबंधात्मक देखभाल आणि उपचार मिळविण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना सक्षम बनवेल. या कार्यक्रमामध्ये रोगनिदान, वैद्यकीय सल्ला, उपचार, औषधांचा आणि उपकरणांचा खर्च अशा वैद्यकीय खर्चांचा समावेश असेल व कंपनीकडून एलजीबीटीक्‍यू+ समुदायांतील कर्मचाऱ्यांसह आपले सर्व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय तसेच यांना दिल्या जाणाऱ्या विद्यमान वैद्यकीय मदतीच्या व्यतिरिक्त ही मदतही पुरवली जाणार आहे. त्याचबरोबर कंपनीद्वारे प्रमाणीकृत सहयोगी संस्थांच्या माध्यमातून विशेषज्ज्ञताप्राप्त आणि प्रशिक्षित डे-केअर सेवाही पुरवली जाणार आहे तसेच कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना या प्रवासाला योग्य दिशा देता यावी यासाठी एम्प्लॉई असिस्टन्स प्रोग्राम (ईएपी) २४X७ सर्वकाळ उपलब्ध केला जाणार आहे. या निमित्ताने पीअॅण्‍डजीने केवळ आपल्या भारतातील उद्योगासाठीच नव्हे तर पीअॅण्‍डजीच्या जगभरातील कार्यालयांसाठी अपंगत्व आणि विशेष गरजा असलेल्या मुलांचे पालक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक मदत पुरविण्याच्या उपक्रमाचा पाया घातला आहे व हा कार्यक्रम इतर बाजारपेठांसाठी नवे ज्ञान मिळविण्याचा मंच ठरणार आहे.
पीअॅण्‍डजीच्या भारतीय उपखंडासाठीच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख श्रीनिवास पी. एम. म्हणाले, “पीअॅण्‍डजीमध्ये केअर अर्थात देखभाल ही आमच्या लोकांसाठीच्या धोरणाची आधारशिला आहे. आम्ही आमच्या लोकांची व त्यांच्या कुटुंबियांची काळजी वाहतो. त्यांचे आरोग्य आणि स्वास्थ्य यांना प्राधान्य देण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत, व त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. अपंगत्वाचे लवकरात लवकर निदान झाल्यास व त्यावर उपचार केले गेल्यास भविष्यात त्याचा सकारात्मक परिणाम होतो असे अनेक पाहण्यांतून निदर्शनास आले आहे. ‘लीड विथ केअर’च्या सोबतीने आमच्या लोकांना आपल्या मुलांसाठी सुरुवातीच्या टप्प्यावरच वैद्यकीय मदत आणि शुश्रूषेच्या सुविधा मिळण्यास मदत व्हावी हा आमचा प्रयत्न आहे, ज्यामुळे त्यांच्या वाढीवर आणि एकूण जीवनमानाच्या दर्जावर लक्षणीय परिणाम होऊ शकेल. आमच्या कर्मचाऱ्यांसाठी हा आयुष्यातील एक खडतर टप्पा असू शकतो आणि म्हणूनच या प्रवासामध्ये त्यांना आवश्यक ते सहकार्य मिळावे यासाठी आम्ही आमच्या एम्प्लॉयी असिस्टिंट प्रोग्रामच्या रूपाने त्यांना मदतीचा हात देऊ करत आहोत.”हा उपक्रम प्रिवेंशन इस बेटर दॅन क्युअर अर्थात उपचारांपेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला या आमच्या तत्वज्ञानाशी मेळ साधणारा आहे. आमचे लोक आणि त्यांचे कुटुंब जेव्हा खरोखरी आनंदी असेल आणि पूर्णपणे निरोगी असेल तेव्हाच त्यांना आपल्या कामावर शंभर टक्के लक्ष देता येईल, असे आम्हाला वाटते. या तसेच इतर अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही यापुढेही लीड विथ केअर हे आपले उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न करत राहू.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar