*‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी म्हापसा येथे २६ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

.

*‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी म्हापसा येथे २६ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्र-जागृती सभा !*
म्हापसा, २४ फेब्रुवारी – हिंदु जनजागृती समितीने ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी म्हापसा येथे रविवार, २६ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता श्री सिद्धपुरुष नारायणदेव देवस्थान सभागृह, काणका बांध, म्हापसा येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले आहे.
भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय-आयोग नाही. मुसलमान आणि ख्रिस्ती यांना धार्मिक शिक्षण देणार्‍या शाळांना सरकारी अनुदान, तर हिंदूंना भगवत्गीतेसह धार्मिक शिक्षण देण्यावरच आक्षेप आहे ! देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी-चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या हजारो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या प्रचाराच्या दृष्टीने हिंदुत्वनिष्ठ संघटना, सामाजिक संघटना, मंदिर समिती, आदींमध्ये बैठका किंवा वैयक्तिक गाठीभेटी यांच्या माध्यमांतून प्रचार करण्यात आला आहे. तसेच *घरोघरी* प्रचार करण्यात आला आहे. या सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थिती लावावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

आपला विश्वासू,
डॉ. मनोज सोलंकी
हिंदु जनजागृती समितीकरिता
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar