शांता विद्यालयात आंतर शालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे आयोजन

.

शांता विद्यालयात आंतर शालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे
पासै वाताहार
आज मनुष्य आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली आहे . हे शक्य झाले ते केवळ विज्ञानामुळे तर विज्ञानासंबंधी विद्यार्थ्यांमध्ये रुची वाढवावी तसेच प्रयोगशील वृत्ती त्यांच्यामध्ये वाढविण्यासाठी शाळेच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त विद्यार्थी भारती संचालित सडये शिवोली येथील श्री. शांता विद्यालयांमध्ये राज्य पातळीवर आंतरशालेय विज्ञान प्रकल्प तयार करणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते आय.के. पै तसेच स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. पद्मनाभ लोटलीकर व सौ सुनीता संदीप पाळणी लाभले होते तसेच कार्यक्रमाला विविध शाळांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रजिता सांगाळे ,शाळेचे व्यावस्थापक श्री. शिवाजी पाटील, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी गण यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम शिक्षक श्री.नवनाथ सावंत , श्री.तुकाराम नाईक, सौ.प्रणया गावकर, सौ.सिद्धी शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने व विज्ञान गीताने करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ.प्रजिता सांगाळे यांनी उपस्थित मान्यवरांच्या कार्यकृत्याचा परिचय करून दिला तसेच शब्दसुमनांनी त्यांचे स्वागत केले. ” जागतिक कल्याणासाठी जागतिक विज्ञान” या विषयावर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण व रचनात्मक असे विज्ञान प्रकल्प तयार केले होते प्रमुख पाहुणे आय. के.पै यांनी विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केले. स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जी. एस .अमोणकर म्हापसा या शाळेला प्राप्त झाले तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सेंट फ्रान्सिस झेवियर या शाळेला प्राप्त झाले तसेच तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सरस्वती हायस्कूल, जुवे यांना प्राप्त झाले .विजेत्यांना रोख रक्कम बक्षिस, प्रशस्तीपत्रक व चषक प्रदान करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली .शिक्षिका कु. रक्षंदा आमोणकर यांनी बक्षिसे जाहीर केली .या स्पर्धेची बक्षीसे थोर समाजसेवक व व्यावसायिक श्री.शिवशंकर मयेकर यांच्याद्वारे पुरस्कृत करण्यात आले होते .यावेळी शाळेमध्ये आय.के. पै व पद्मनाभ लोटलीकर यांच्याद्वारे आश्चर्यकारक विज्ञान व अद्भुत प्रयोग यावर खास सत्र विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ.प्रणया गावकर यांनी केले तर आभार प्रकटण शिक्षक श्री.तुकाराम नाईक यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar