सम्राट क्लब म्हापसाचे कार्य अभिनंदिनीय :गोविद शिरोडकर
म्हापसा दि ०१(प्रतिनिधी ):-सम्राट क्लब म्हापसा यांनी आजपर्यंत आपल्या कारकिर्दीत अनेक सामाजिक, सांस्कृतिक, तसेच शैक्षणिक कार्यात पुढाकार घेऊन आपलं नाव गोमंतकात रुजविले. आणि नवनवीन कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम केले. त्यामुळे महारुद्र संस्थान त्याच्या या उपक्रमाला गेल्या अनेक वर्षांपासून सहकार्य करीत आहे. आणि यापुढेही त्यांच्या या उपक्रमाला आमचा पाठिंबा असेल असे आश्वासन महारुद्र संस्थांचे अध्यक्ष गोविंद (बाप्पा )शिरोडकर यांनी दिले.
सम्राट क्लब म्हापसा आयोजित मास्टर दत्ताराम वळवईकर नाट्य महोत्सवा आयोजित केलेल्या उदघाटन समारंभावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने शिरोडकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत सम्राट क्लब इंटर्नशलचे प्रतिनिधी मनोज कारापुरकर, सम्राट क्लब म्हापसाचे अध्यक्ष चंद्रकांत आमोणकर, सचिव सुब्राय चोडणकर, खजिनदार रितेश कारेकर, व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी गोविंद शिरोडकर यांच्या हस्ते दीप प्रज्योलीत करून नाट्य महोत्सवाचे उदघाटन व मास्टर दत्ताराम वळवईकर यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सम्राट जयेश चुरी यांनी मास्टर दत्ताराम वळवईकर यांच्याबद्दल माहिती करून दिली. स्वागत व प्रास्ताविक भाषण अध्यक्ष चंद्रकांत आमोणकर यांनी केले.सूत्रसंचालन सम्राट गोविंदराज देसाई यांनी तर शेवटी आभार सचिव तथा प्रकल्प अधिकारी सुब्राय चोडणकर यांनी मानले. त्यानंतर सम्राट क्लब म्हापशाच्या पधादिकारी यांनी नांदी सादर केली.
फोटो :-म्हापसा येथे मास्टर दत्ताराम वळवईकर नाट्य महोत्सवाचे दीप प्रज्योलीत करून उदघाटन करताना गोविंद शिरोडकर व इतर मान्यवर.
.