श्री. शांता विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघटनेची बैठक

.

श्री. शांता विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघटनेची बैठक

विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री.शांता विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख वक्तेम्हणून श्री.दिलीप बेतकीकर उपस्थित होते. विद्याभारतीचे सहसंघटन मंत्री श्री.पुरूषोत्तम कामत , व्यावस्थापक श्री.शिवाजी पाटील , मुख्याध्यापिका सौ. प्रजिता सांगाळे, माजी मुख्याध्यापक श्री. कमलाकांत वायंगणकर, श्री. शशिकांत नाईक ,सडये‌ गावचे माजी सरपंच श्री. फ्रान्सिस फर्नान्डीस तसेच शाळेचे माजी विद्यार्थी ,शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी हजर होते. मुख्याध्यापिका सौ.प्रजिता सांगाळे यांनी उपस्थित मान्यवरांच्या कार्यकृत्याचा परिचय करून दिला व शब्दसुमनांनी त्यांचे स्वागत केले.
तद् नंतर श्री .पुरूषोत्तम कामत यांनी शाळेच्या ५० वर्षाच्या यशस्वी वाटचालीचा इतिहास सांगितला.
तसेच श्री. दिलीप बेतकेकर यांनी शाळेच्या ५० व्या वर्षानिमित्त वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग असावा याबद्दल आव्हाहन केले.यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमा संबंधी आपले विचार सुचविले . तसेच
शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान दिलेल्या शुभचिंतकांना शाल ,श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी माजी विद्यार्थी संघटनेच्या नविन समितीची स्थापना करण्यात आली.यामध्ये श्री.देवानंद पेडणेकर यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले, तर उपाध्यक्षपदी श्री.राजेश चोडणकर व श्री. प्रल्हाद कासकर यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून श्री.वैभव वायंगणकर यांची निवड करण्यात आली व खजिनदार म्हणून कु.संपदा रायकर यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक श्री. विश्वास सांगाळे यांनी केले तर आभार प्रकटन शिक्षक श्री. संगम चोडणकर केले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar