एक चांगला कवी होण्यासाठी वाचन व निरीक्षण असणे गरजेचे आहे तसेच एक चांगला लेखक होण्यासाठी वाचन करणे

.

“एक चांगला कवी होण्यासाठी वाचन व निरीक्षण असणे गरजेचे आहे तसेच एक चांगला लेखक होण्यासाठी वाचन करणे महत्त्वाचे आहे कारण वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे या भाषेजवळ शब्दांचा खजिना आहे म्हणूनच वाचाल तर वाचाल या अनुसंघाने वाचन करणे अतिशय महत्त्वाचे आहे “असे उद्गार विद्याभारती संचालित पीपल्स हायस्कूल कामुर्ली येथे मराठी राज्यभाषा दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री उमेश महालकर यांनी काढले.यानिमित्त विद्यार्थ्यांनी मराठी गीत ,गणेश वंदना व नाटिका सादर केली. तसेच प्रमुख पाहुणे माननीय श्री उमेश महालकर यांनी स्वतःच्या आशादीप या काव्यसंग्रहातील काही कविता सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांचे गट करून काही विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या विषयावर एक नाटिका सादर करायची होती. यात इयत्ता पाचवी व दहावी यांना प्रथम इयत्ता सातवी व आठवी यांना द्वितीय तर इयत्ता सहावी व नववी यांना तृतीय बक्षीस प्राप्त झाले त्यानंतर विद्यालयाच्या शिक्षिका सौ.श्रद्धा लोटलीकर यांनी *”चिमण्यांनो परत* *फिरा रे”* हे गीत सादर केलं .यावेळी व्यासपीठावर सातेरी प्राथमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्षा योगिता सप्तोजी, पीपल्स हायस्कूल कामुर्लीचे मुख्याध्यापक माननीय श्री.संदीप पाळणी व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे , श्री उमेश महालकर उपस्थित होते . सुरुवातीला सौ.श्रद्धा लोटलीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शिल्पा नाईक यांनी केले शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar