भारतातील स्त्री होस्ट्सनी २०२२ सालात एअरबीएनबीमार्फत होस्टिंग करून कमावले १ अब्ज (१०० कोटी) रुपये*

.

*भारतातील स्त्री होस्ट्सनी २०२२ सालात एअरबीएनबीमार्फत होस्टिंग करून कमावले १ अब्ज (१०० कोटी) रुपये*

-आंतरराष्ट्रीय महिला दिन जवळ आलेला असताना एअरबीएनबीतर्फे एअरबीएनबी होस्ट्स आणि पाहुण्यांचा प्रवास एका पॅनल इव्हेण्टद्वारे साजरा करण्यात आला. या पॅनलवर अभिनेत्री सोहा अली खान, गायिका व गीतकार लिसा मिश्रा, स्त्री उद्योजक कीर्ती पूनिया आणि एअरबीएनबी होस्ट काकोली यांचा समावेश होता

-हा कार्यक्रम म्हणजे लिंगसमानता साजरी करण्याचा एक प्रयत्न होता तसेच याद्वारे स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात दिलेल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक योगदानालाही याद्वारे मान्यता देण्यात आली

-भारतात स्त्री होस्ट्सनी एअरबीएनबीद्वारे होस्टिंग करून १ अब्ज (१०० कोटी) रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले. शिवाय, भारतातील ज्येष्ठ स्त्री होस्ट्सनी (६०हून अधिक वयाच्या) २०२२ मध्ये २० कोटी रुपये कमावले

-देशात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दिल्ली व पश्चिम बंगालमध्ये स्त्री होस्ट्सचा वाटा सर्वाधिक आहे

भारत, मार्च १, २०२३: आंतरराष्ट्रीय महिला दिन साजऱ्या करणाऱ्या महिन्याची सुरुवात, एअरबीएनबीने एका पॅनल चर्चेच्या आयोजनाने केली. या पॅनलवर अभिनेत्री व लेखिका सोहा अली खान, गायिका व गीतकार लिसा मिश्रा, स्त्री उद्योजक कीर्ती पूनिया (सहसंस्थापक, रिलव्ह) आणि एअरबीएनबीच्या होस्ट काकोली यांचा समावेश होता. ‘एम्ब्रास इक्विटी’ (समान वाट्याचा स्वीकार) या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या यंदाच्या विषयावर या सर्वांनी आपले विचार मांडले.

एअरबीएनबीच्या भारतातील व जगभरातील समुदायात स्त्रियांचा वाटा मोठा आहे. एअरबीएनबीच्या जागतिक होस्ट समुदायात निम्म्याहून अधिक स्त्रिया आहेत*. हे होस्ट्स स्थानिक समुदायांनाही आधार देण्याचे काम करतात. या स्त्रिया अन्य स्त्रियांना रोजगार पुरवतात. यातील काही सीमांत समुदायांमधील असतात. त्यामुळे आर्थिक उलाढालींमध्ये संप्रेरकाची भूमिका बजावली जाते तसेच पुनर्वाढीमध्ये योगदानही दिले जाते. एअरबीएनबी स्त्री होस्ट्सनी भारतात २०२२ सालात एकत्रितरित्या १ अब्ज रुपयांहून अधिक उत्पन्न कमावले आहे**, असे एअरबीएनबीच्या आकडेवारीतून दिसून येते. याशिवाय, एअरबीएनबीवरील ६० वर्षांहून अधिक वयाच्या स्त्री होस्ट्सनीही भारतात २०२२ सालात २० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न कमावले आहे. यांच्यापैकी अनेकींना या कामामुळे निवृत्तीनंतर आवश्यक असलेले उत्पन्न प्राप्त होत आहे.
एअरबीएनबी नातेसंबंध व आपलेपणाच्या भावनेला प्रोत्साहन देते आणि आमच्या वैविध्यपूर्ण होस्ट समुदायाच्या साजरीकरणासाठी तसेच वाढ व यश यांना बढावा देणारे सर्वसमावेशक वातावरण तयार करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. एअरबीएनबीचे कित्येक होस्ट त्यांच्या स्थानिक समुदायांना आधार देत आहेत आणि विशेषत: सीमांत समुदायांमध्ये लिंगसमानता आणण्याच्या दृष्टीने सुक्ष्मउद्योजकांना सहाय्य करत आहेत.

एअरबीएनबी भारत, आग्नेय आशिया, हाँगकाँग व तैवानचे महाव्यवस्थापक अमनप्रीत बजाज, एअरबीएनबीवर स्त्रियांनी होस्ट होण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना, म्हणाले, एअरबीएनबीमधील आमच्या होस्ट व पाहुण्याच्या समुदायांमध्ये वैविध्य, समता आणि समावेशकतेची जोपासन करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. स्त्री होस्ट आमच्या प्लॅटफॉर्मला एक अनन्यसाधारण मूल्य निर्माण करून देत आहेत याची जाणीव आम्हाला आहे. यामुळे एक वैविध्यपूर्ण दृष्टिकोन प्राप्त होतो तसेच वेगळी ऊर्जा मिळते आणि त्यायोगे एअरबीएनबीच्या पाहुण्यांचा एकंदर अनुभव अधिक चांगला होतो. स्त्री उद्योजक हा आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि सामाजिक रूपांतरणाला चालना देणारा निर्णायक घटक आहे असे आम्हाला प्रकर्षाने वाटते. स्त्री होस्ट्सना सहाय्य करण्यासाठी आम्ही जगभरातील स्त्री समुदायांसोबत काम करतो, त्यांना त्यांच्या घरांमधील संभाव्यता खुली करण्यासाठी मदत करतो आणि उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी आवश्यक ती संसाधने व ज्ञान त्यांना देतो. सर्वांचा आदर राखणारे व सर्वांना सामावून घेणारे वातावरण जोपासण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि अधिक वैविध्यपूर्ण व न्याय्य होस्ट समुदाय निर्माण करण्याचे प्रयत्न अधिकाधिक बळकट करण्यासाठी सातत्याने काम करत आहोत.”

देशातील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या ५ राज्यांमध्ये स्त्री होस्ट्सची संख्या सर्वाधिक आहे, असे एअरबीएनबीच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. ***.

दिल्ली राजधानी परिसर (एनसीआर) आणि पाँडीचेरी येथे २०१३ सालापासून होस्टिंग करत असलेल्या होस्ट काकोली त्यांच्या होस्टिंग प्रवासाबद्दल म्हणाल्या, “मी एअरबीएनबीची होस्ट म्हणून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील प्रवास सुरू केला तेव्हा एक व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक बारीकसारीक गोष्टींबद्दल मला काहीच माहिती नव्हती. एअरबीएनबीच्या प्लॅटफॉर्मने माझ्यासाठी काम सुरू करणे सोपे केले आणि आता मी प्लॅटफॉर्मवर सुमारे २४ लिस्टिंग्ज करण्याएवढी वाढ साध्य केली आहे. मला जगभरातील पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याचा आनंद मिळाला आणि अधिक कर्मचारी नियुक्त करण्याची संधीही मिळाली. त्यामुळे मला जागेची देखभाल करण्यात तसेच माझ्या पाहुण्यांना ‘सुपरहोस्ट’ अनुभवाचा

आनंद देण्यात मला मदत होत आहे. एअरबीएनबीने गेल्या काही वर्षांत मला आणि माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याची तसेच एक यशस्वी व्यवसाय प्रस्थापित करण्याची क्षमता दिली आहे.”

अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खान म्हणाली, “स्त्रियांच्या सक्षमीकरणाबाबत जे स्थित्यंतर, विशेषत: भारतात, दिसून येत आहे, त्यामुळे मला अत्यानंद होत आहे. मात्र, आपल्याला अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे असेही मला वाटते. यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा विषय मला खूपच आपलासा वाटतो, कारण, माझा लिंगसमानतेवर ठाम विश्वास आहे आणि मी या संकल्पनेचा प्रसारही करते. हॉस्पिटॅलिटी उद्योगात समानतेचा स्वीकार करण्यासाठी तसेच स्त्रियांना खऱ्या अर्थाने आनंद देणारे काम करण्याची संधी देण्यासाठी मदत करण्याचा एअरबीएनबीचा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहे. यामुळे आपण एका स्वयंपूर्ण भवितव्याकडे वाटचाल करत आहोत.”
गायिका व गीतकार लिसा मिश्रा म्हणाली, “प्रवास मला नेहमीच खूप आवडतो आणि एक कलावंत म्हणून प्रेरणा प्राप्त करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे असे मला वाटते. एअरबीएनबीच्या माध्यमातून केलेल्या प्रवासांमध्ये मला काही खऱ्या अर्थाने थक्क करणाऱ्या ठिकाणांना भेटी देण्याची संधी मिळाली. त्यातील प्रत्येक ठिकाणाने माझ्यावर अनन्यसाधारण छाप उमटवली. मात्र, यातील माझ्या हृदयाला स्पर्श करून जाणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे मला या प्रवासात काही अद्भूत स्त्रियांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यातील काही माझ्यासारख्याच भटक्या होत्या, तर काही एअरबीएनबीच्या माध्यमातून होस्टिंग करून आपले नवीन आयुष्य उभे करणाऱ्या आणि उद्योजकतेच्या प्रवासाला निघालेल्या होत्या. स्त्रिया समतेचा स्वीकार करत आहेत आणि स्वयंपूर्णच्या दिशेने मार्ग काढत आहेत हे खूपच प्रेरणादायी आहे.”

रिलव्हच्या सहसंस्थापक कीर्ती पूनिया म्हणाल्या, “पारंपरिक व्यवस्थापनाचे काम ते उद्योजकता व फॅशनविश्व या माझ्या स्थित्यंतराच्या प्रवासात मला सुदैवाने स्त्रियांचे प्रेरणादायी उद्योजक चैतन्य बघण्याची संधी मिळाली. केवळ आपल्या स्वत:च्या वाढीवर लक्ष केंद्रित न करता, आजूबाजूच्या लोकांच्या वाढीची जोपासना करणाऱ्या अनेक कणखर स्त्रिया मला बघायला मिळाल्या. एअरबीएनबीचा खंदा वापर करणारी म्हणून, मला अनेक उद्योजक स्त्रियांचे चैतन्य बघता आले. या स्त्रियांना एअरबीएनबी होस्ट्स होण्याची संधी मिळाली आहे आणि त्या आजूबाजूच्या समुदायालाही सक्षम करत आहेत. स्त्री सबलीकरणाची जिवंत उदाहरणे असलेल्या अशा लक्षणीय स्त्रियांच्या गाथा येथे साजऱ्या करता आल्या याचा मला खूप आनंद वाटतो.”

*स्त्री होस्ट्सची टक्केवारी मोजणाऱ्या, एअरबीएनबीच्या, ३१ डिसेंबर २०२२ रोजी उपलब्ध अंतर्गत डेटावर आधारित (ज्या होस्ट्स स्वत:हून त्या स्त्री असल्याचे कळवतात, त्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित)
** भारतातील २०२२ सालातील होस्ट्सच्या उत्पनाची मोजणी करणाऱ्या एअरबीएनबीच्या अंतर्गत डेटावर आधारित (१ जानेवारी २०२२ – ३१ डिसेंबर २०२२ या काळातील आकडेवारी)
***भारतातील एअरबीएनबीच्या होस्ट्सबाबतच्या, ३१ डिसेंबर २०२२ रोजी उपलब्ध अंतर्गत डेटावर आधारित (ज्या होस्ट्स स्वत:हून त्या स्त्री असल्याचे कळवतात, त्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar