शाश्वतता, लक्झरीची सांगड घालत बांधणी शक्य ः खुराणा

.

शाश्वतता, लक्झरीची सांगड घालत बांधणी शक्य ः खुराणा

पणजी ः शाश्वतता व ऐश आरामाच्या वस्तूंची सुरेखपणे सांगड घालताना भविष्यातील हॉटेल्सची बांधणी शक्य आहे, असे सेंट गोबेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक (घर व आदरातिथ्य उद्योग) हेमंत खुराणा यांनी पत्रकारांशी पणजी दोनापावला येथील ताज रिसॉर्ट अँड कन्वेंशन सेंटर येथे आयोजित प्रीमियर हॉस्पिटॅलिटी समिटमध्ये संवाद साधताना सांगितले. वस्तूंचा पुनर्वापर करतानाच नैसर्गिक साधनसंपत्तीचा किमान वापर करणे हा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सेंट गोबेनचे आशिया-पॅसिफिक व भारत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. संथानम यांची विशेष उपस्थिती होती. भारतातील होम अँड हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात बिझनेस टू बिझनेस (बीटूबी) या द्वारे बस्तान बसवल्यानंतर आता थेट बिझनेस टू कन्झ्युमर (बीटूसी) मध्ये कंपनी आपली पाळेमुळे घट्ट करू पाहत आहे.
गोव्यात सध्यातरी कोणत्याही स्थानिक उद्योगाशी हातमिळवणी करण्याचा विचार किंवा प्रस्ताव नसल्याचे खुराणा म्हणाले. कंपनी 350 वर्षे जुनी आहे. कंपनीकडून देशात 12 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. 2030 सालापर्यंत देशात 30 हजार कोटींचा बिझनेस भारतात करण्याचे लक्ष्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सेंट गोबेन ही बिल्डिंग मटेरियलमधील आघाडीची कंपनी आहे. एचव्हीएस अ‍ॅनारॉक समुह हा हॉस्पिटॅलिटी उद्योगातील मार्केट लिडर असल्याने त्यांच्याशी जोडले गेलो आहोत. आम्ही दोघे मिळून कन्स्ट्रक्शन उद्योगात जबाबदारीची व शाश्वततेची जाणिव करून देण्यासाठी जागृती करणार आहोत.
बांधकाम करताना वजनाने हलके तरीसुद्धा टिकाऊ असलेल्या ड्रायवॉलचा वापर आमच्यातर्फे केला जातो. त्यामुळे ब्रिक व ब्लॉकचा वापर टाळता येतो. विशेष ग्लेझिंग खिडक्यांद्वारे सूर्यप्रकाशाचा पूर्ण आनंद घेता येतो. तंत्रज्ञानाच्या वापरानाने या खिडक्यांद्वारे उष्णता खोलीत शिरणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली जाते, असे खुराणा यांनी म्हटले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar