थिवि ग्रामपंचायत आयोजित कला आणि क्रीडा महोत्सव २०२३ चा सांगता सोहळा थिवि माडेल येथील फाज हाऊसिंग

.

म्हापसा

थिवि ग्रामपंचायत आयोजित कला आणि क्रीडा महोत्सव २०२३ चा सांगता सोहळा थिवि माडेल येथील फाज हाऊसिंग काॅलनीचा बहुउद्देशीय सभागृहात संपन्न झाला.
महोत्सवाची सांगता लोकनृत्य स्पर्धा व बक्षीस वितरणाने करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तसेच मच्छिंमार मंत्री निळकंठ हळर्णकर सरपंच अर्जुन आरोसकर, उपसरपंच हर्षता कलंगुटकर, पंच सदस्य सुनीता साळगावकर, समिक्षा मयेकर, व्यंकटेश शिरोडकर, शिवम परब, सचिव धिरज गोवेकर, महोत्सवाचे अध्यक्ष प्रा. सुभाष कौठणकर, फाज हाऊसिंग काॅलनीचे अध्यक्ष पासैकर, परीक्षक लाडू परवार, दिलीप पलसरकर व शौनक कवठणकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कला आणि क्रीडा महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे वितरण करण्यात आले यात पाच षटकाच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धात पहिल बक्षीस रोख रक्कम रू२५०००, व चषक माडेल येथील ए. के. बाॅयजला मिळाले तर उपविजेता संघ बांदेश्वर बाॅयजला रोख रक्कम रू १५००० व चषक देण्यात आले, उत्कृष्ट फलंदाज म्हणून मनोज हळर्णकर, उत्कृष्ट गोलंदाज विनायक साळगावकर तर मॅन ऑफ द सिरीज चे बक्षीस मनोज मयेकर याना देण्यात आले, फुगडी स्पर्धेत रोख रक्कम रू १०००० व आकर्षक चषक चे पहिले बक्षीस श्री सातेरी महामाया राष्ट्रोळी संघ याना मिळाले. दुसरे बक्षीस रोख रक्कम रू७००० व चषक श्री राष्ट्रोळी ब्राह्मण संघ, तिसरे रू ५००० चे बक्षीस लक्ष्मी नारायण गृप तर उतेजनाथ बक्षीस श्री महागणपती फुगडी मंडळ व आश्रया गृप याना देण्यात आले.
पुरुष भजन स्पर्धेचे पहिले बक्षीस रोख रक्कम रू १०००० व चषक श्री राष्ट्रोळी भजन मंडळ याना देण्यात आले दुसरे बक्षीस रोख रक्कम रू ६००० व चषक महागणपती गृप तर तिसरे रोख रक्कम रू ४००० चे बक्षीस श्री सातेरी महामाया राष्ट्रोळी हनुमान या संघाला देण्यात आले स्पर्धेचे परीक्षण दामोदर हेदे यांनी केले ५० बर्षावरील दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत विजेते सुभाष कौठणकर व शशिधरन ए. के. याना रोख रक्कम १०००० व चषक देण्यात आले तर उपविजेता संघातील बर्नाड डिसोझा व एलॅक्स फनाडिस याना रोख रक्कम रू ५०००वचषक देण्यात आला. ५० बर्षाखालील गटात विजेते ठरलेले राजेश रेपाल व सृजल तिरोडकर याना रोख रक्कम रू १०००० व चषक देण्यात आला तर उपविजेता ठरलेले कृष्ण प्रसाद शशिधरन व विष्णू आराकाल याना रोख रक्कम रू ५०००वचषक देण्यात आले या स्पर्धेचे उदघाटन बॅडमिंटन प्रशिक्षक राॅय आयाईद यांच्या हस्ते करण्यात आले होते. महिला भजन स्पर्धेतील पहिले बक्षीस रोख रक्कम रू १०००० व चषक श्री महागणपती महीला भजनी मंडळ ला देण्यात आले  रोख रक्कम रू ६००० चे दुसरे बक्षीस श्री सातेरी महामाया सांस्कृतिक महिला मंडळ तर रोख रक्कम रू ४००० चे तिसरे बक्षीस श्री गणेश महिला भजनी मंडळ या संघाला देण्यात आले. उतेजनाथ बक्षीस राष्ट्रोळी भजनी महिला मंडळ याना देण्यात आले या स्पर्धेचे परीक्षण दामोदर हेदे व स्वनील मांद्रेकर यांनी केले. ३ खेळाडूच्या फुटबॉल टाय ब्रेक स्पर्धेत धानवा बाॅयजला या संघाला पहिले बक्षीस रोख रक्कम रू १०००० व चषक देण्यात आला तर उपविजेता ठरलेले जे. के. बाॅयज धामणे या संघाला रोख रक्कम रू ५००० व चषक देण्यात आला या स्पर्धेचे उदघाटन पंच लीयो कास्तलिनो यांच्या हस्ते करण्यात आले होते. उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून सिरिल परेरा याना चषक देण्यात आला तर या स्पर्धेत सर्वाधिक गोल केल्या बदल गौरव आरोलकर याना चषक प्रदान करण्यात आला. लोक नृत्य स्पर्धेत पहिले बक्षीस रोख रक्कम रू १५०००, व चषक श्री महागणपती डान्स गृप माडेल या संघाला देण्यात आला तर दुसरे बक्षीस रोख रक्कम रू १०००० व चषक फाज हाऊसिंग काॅलनी लोकनृत्य संघाला देण्यात आले तिसरे बक्षीस श्री राष्ट्रोळी महीला मंडळ शिवराकवाडा तर उतेजनाथ बक्षीस श्री राष्ट्रोळी ब्राह्मण गृप शिवराकवाडा याना देण्यात आले या स्पर्धेचे परीक्षण लाडू परवार व कुलदीप कामत यांनी केले.
या प्रसंगी बोलताना निळकंठ हळर्णकर यांनी थिवि पंचायत ने सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करून त्याच्या अंगी असलेल्या कला दाखवण्याची संधी दिल्या बदल सरपंच व इतर पंच सदस्य चे अभिनंदन केले अशाच प्रकारचे उपक्रम या पुढेही आयोजित करावे व त्यासाठी आपली सर्वोती मदत व सहकार्य आयोजकांना असेल असे म्हणाले बादैश तालुक्यातील रवींद्र भवनाचा प्रश्न अनेक वर्षे भिजत पडला आहे परंतु हा प्रश्न लवकरच सुटण्याच्या मार्गावर असून थिवि मतदार संघात रवींद्र भवनाचा प्रकल्प साकारू शकतो असे जाहीर केले. अर्जुन आरोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले परीक्षक लाडू परवार यांनी काही लोकगीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कला आणि क्रीडा महोत्सव चे अध्यक्ष सुभाष कौठणकर यांनी विजेत्या ची नावे घोषित केली हर्षता कलंगुटकर यांनी आभार मानले. तर ममता नाईक यांनी आभार मानले. फोटो  लोकनृत्य स्पर्धा तील विजेत्याना बक्षीस देताना निळकंठ हळर्णकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar