एकपात्री सवेश नाट्यसंवाद स्पर्धेत लक्ष्मी महाले प्रथम.

.

एकपात्री सवेश नाट्यसंवाद स्पर्धेत लक्ष्मी महाले प्रथम.
श्री वेताळ देवस्थान, खर्रे वाडे सुकूर आणि सम्राट क्लब, म्हापसा आयोजित अखिल गोवा एकपात्री मराठी सवेश नाट्य संवाद स्पर्धेत लक्ष्मी महाले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर पुष्पशील नागवेकर व श्रद्धा गवंडी यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
याशिवाय उत्तेजनार्थ पहिले दिलीप गोसावी, उत्तेजनार्थ दुसरे दत्ताराम ठाकूर व उत्तेजनार्थ तिसरे बक्षीस शेखर शेट्ये यांना प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सम्राट क्लब, म्हापसाचे अध्यक्ष सम्राट चंद्रकांत आमोणकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री वेताळ देवस्थानचे अध्यक्ष नारायण हिरोजी यांनी परीक्षकांची ओळख उपस्थितांना करून दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. गोविंदराज देसाई आणि श्री. योगेश हिरवे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या अखेरीस प्रकल्प अध्यक्ष श्री विनोद मळीक यांनी आभार प्रदर्शन केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar