अड्डा52च्या सर्वांत मोठ्या पोकर चॅम्पियनशिपची सांगता- एसीएल 2.0, राम कक्कर ठरले विजेते*

.

*अड्डा52च्या सर्वांत मोठ्या पोकर चॅम्पियनशिपची सांगता- एसीएल 2.0, राम कक्कर ठरले विजेते*

राम कक्कर यांनी अड्डा52 गेम अँबॅसेडर हा किताब आणि २० लाख रुपये मूल्याचा करार प्राप्त केला.

अड्डा52ने आपल्या अड्डा52 चॅम्पियन्स लीडरबोर्ड (एसीएल) २.० या स्पर्धेची सांगता १९ फेब्रुवारी २०२३ रोजी केली. गोव्यातील वकील राम कक्कर (वय वर्षे ३९) एसीएल २.० पर्वाचे विजेते ठरले. त्यांच्याशी अड्डा52चा २० लाख रुपये किमतीचा करार करण्यात आला. वर्षभर चाललेल्या लीडरबोर्ड स्पर्धेची सांगता पोकरच्या थरारक अंतिम फेरीने झाली. गोव्यातील डेल्टिन रोयाल येथे झालेल्या अंतिम फेरीत नऊ खेळाडू विजेतेपदासाठी लढत होते. या लढतीचे संपूर्ण देशात लाइव्ह स्ट्रीमिंगही करण्यात आले.

राम कक्कर यांनी आघाडीचे स्थान पटकावले, तर दिल्लीचे अशीत शर्मा उपविजेते ठरले. त्यापाठोपाठ दिल्लीचेच हर्ष डेंबला यांनी पोकर युद्धात तिसरे स्थान प्राप्त केले.

एसीएल २.०चे विजेते ठरल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राम कक्कर म्हणाले, “सर्वच खेळाडू अफलातून खेळत होते आणि लढत खूपच अटीतटीची होती. हा प्रवास बराच दीर्घ होता आणि विजयाची भावना आतपर्यंत भिनण्यास थोडा वेळ लागेल. अड्डा52 टीमचा एक भाग म्हणून या गेमचे आणि पोकर समुदायाचे ऋण फेडण्यास मी आता उत्सुक आहे.” ते पुढे म्हणाले, “अड्डा52 विविध कौशल्य स्तरांवरील खेळाडूंना उत्तम संधी देते. तसेच यात वाटा उचलणाऱ्या सर्वांना अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची संधी देते.

मासिक लीडरबोर्डस् आणि तिमाही एसएनजींच्या माध्यमातून पात्र ठरण्यासाठी अनेक संधी दिल्या जातात. लाइव्ह इव्हेण्टचा अनुभव खूपच मजेशीर होता. यात फ्लाय डायनिंग आणि यॉट पार्टीशिवाय अन्य अनेक गमतीदार गोष्टी होत्या. अंतिम फेरी अत्यंत रोचक झाली. अत्यंत चांगल्या खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी यात मिळाली. शिवाय, त्यांच्या गेम अँबॅसेडर्सपैकी एक म्हणून अड्डा52मध्ये सहभागी होण्यास मी खूप उत्सुक आहे.’’

अड्डा52चे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर श्री. कृष्णेंदू गुहा या स्पर्धेच्या अंतिम फेरीबद्दल म्हणाले, “सर्वप्रथम मी एसीएल २०२२च्या विजेत्यांचे व उपविजेत्यांचे अभिनंदन करतो. एसीएल २०२२ अंतिम फेरीत काही लक्षणीय पोकर सामने झाले. प्रेक्षकांसाठीही विलक्षण उत्साही वातावरण तयार झाले होते.

वेगवेगळ्या शहरांतील आणि वेगवेगळ्या वयोगटांतील पोकर खेळाडूंना एकत्रितपणे पोकर खेळताना बघणे हा रोमांचक अनुभव होता. एसीएल २०२२ खूपच यशस्वी ठरली आणि एसीएल ३.०मध्ये सहभागाचे प्रमाण आणखी वाढेल, असे आम्हाला वाटते.’’
एसीएल २.० अंतिम फेरीनंतर अड्डा52 चॅम्पियन्स नाइट (एसीएन) आणि अड्डा52 चा पुरस्कार सोहळा झाला. अड्डा52 तर्फे वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध कॅश गेम्समध्ये व स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्यांचे यश साजरे करण्यासाठी एसीएनचे आयोजन करण्यात आले होते. एसीएल २०२१चे विजेते अरुण श्रीराम यांनी एसीएल २.०च्या विजेत्याचा सन्मान केला.

याशिवाय अड्डा52 चॅम्पियन्स लीडरबोर्ड अर्थात एसीएल ३.० या पर्वाला यापूर्वी १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरुवात झाली आहे आणि ही स्पर्धा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत चालणार आहे. १.७ कोटी जीटीडी मूल्याच्या बक्षिसांसाठी लढण्याची व आपली प्रतिभा दाखवून देण्याची संधी या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना मिळणार आहे. यामध्ये विजेत्यासाठी २० लाख रुपयांच्या कराराचाही समावेश आहे. अड्डा52 गेम अँबॅसेडर हा किताबही विजेत्याला प्रदान केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या- Adda52.com.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar