आज स्त्री ने संघटित होऊन आता पुढे जायचे आहे ही आता काळाची गरज आहे.

.

आज स्त्री ने संघटित होऊन आता पुढे जायचे आहे ही आता काळाची गरज आहे.

असे उदगार प्रमुख पाहुणे या नात्याने निवृत्त सहाय्यक शिक्षण अधिकारी कु. नीला केरकर यांनी स.प्रा वि.मधला वाडा केरी च्या पालक शिक्षक संघटना व शालेय व्यवस्थापन समिती ने आयोजित केलेल्या महिलादिन निमित्त कार्यक्रमात बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर कु. नीला केरकर ,प्रेक्षा योगाच्या योगा शिक्षिका भावना कोठारी,st मेरी कॉन्व्हेन्ट च्या सिस्टर जुलिया,
पालक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सौ सोनाली वेंगुर्लेकर,अंगणवाडी बाई कु.मीना बुडके, माजी पंच सौ.नमिता केरकर,शाळा प्रमुख सौ यशश्री नाईक उपस्थित होत्या.
शारीरिक स्वास्थ्य बरोबर मानसिक स्वास्थ्य सुद्धा तेवढेच गरजेचे असून दोन्ही समतोल असायला पाहिजे असे प्रतिपादन केरी शाळे च्या शाळा प्रमुख सौ यशश्री नाईक यांनी केले.
त्यासाठी उपस्थित महिलावर्गाला योगा चे आपल्या जीवनामध्ये महत्त्व समजावून देण्यासाठी व शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य समतोल राखण्यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन भावना कोठारी यांनी केले.वेगवेगळ्या आसनाचे प्रात्यक्षिक करून पालकांकडून करून घेतले व त्यांचा मानसिक ताण हलका करायला मदत केली.
महिला दिनाचे औचित्य साधून शाळा प्रमुख सौ यशश्री नाईक यांनी केरी गावच्या रहिवाशी असलेल्या निवृत्त सहायक शिक्षण अधिकारी कु.नीला केरकर यांचा शाल,श्रीफळ व स्मुती चिन्ह देऊन यथोचित सन्मान केला.
तसेच सर्व पालकांनी मिळून शाळेच्या शाळा प्रमुख सौ यशश्री नाईक यांचा ही शाल श्रीफळ व सरस्वती मूर्ती देऊन यथोचित सन्मान केला.
तद्नंतर पालकांनी आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
त्यात सर्वप्रथम पालकांनी स्वागतगीत सादर केले.तद्नंतर वेगवेगळ्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या वेशभूषा चे सादरीकरण करण्यात आले यात सौ.सोनाली वेंगुर्लेकर भारत माता , सौ.सोनाली तळकर झासि की रानी ,सौ.जिया फरास गृहिणी, सौ शैला नाईक सावित्री बाई फुले,लता मंगेशकर सौ.अर्चना नाईक,इंदिरा गांधी सौ.प्रिय मटकर.डॉक्टर सौ.स्मिता नार्वेकर.शिक्षक सौ.हर्षदा फरास.पोलिस सौ.काजल साळगावकर, न्यायाधीश दिपाली नार्वेकर,सानिया मिर्झा सौ प्रेसिला फर्नांडिस ,जिजाबाई सौ जोत्सना चारी.यांनी भाग घेतला व बक्षिसे पटकावली.
पालक सोनाली तळकर याच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी मुलीसाठी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणारे एक नाटकुले सादर केले.
तर पालक सौ.शीला कालोजी यांच्या मार्गदर्शनाखाली पालक व ग्रामस्थांनी मिळून” धालो” ही लोककला सादर केली.
या महीलादिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका मोजरकर,शाळा प्रमुख सौ यशश्री नाईक यांनी पाहुण्यांची ओळख केली तर आभार प्रदर्शन कु.सोनाली हरमालकर यांनी केले .
तर पालक वर्गाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पालक सौ आरती गाड यांनी केले.
या कार्यक्रमासाठी पालकांचा तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व कार्यक्रम यशस्वी केला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar