गणेशगुरुकुल

.

गणेशगुरुकुल    गणेश गुरू कूल सेल्फ हेल्प ग्रुप म्हापसा तर्फे आठ मार्च रोजी महिला दिन खूप उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुकुलच्या संचालिका सौ सुषमा नार्वेकर यांनी केले होते .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राखी पालेकर आणि मंदाकिनी नानोडकर या होत्या. महिला मल्टी टास्किंग असतात. महिलांनी एकमेकांना मदत करून पुढे आणणे महत्त्वाचे आहे असे राखी पालेकर यांनी सांगितले. महिला दिना चे औचित्य साधून सेल्फ हेल्फ ग्रुप साठी पाककृती स्पर्धा आणि फुलांपासून वेणी बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती .पाककृती स्पर्धेमध्ये पहिले बक्षीस कल्पना साळवी ,दुसरे बक्षीस समृद्धी कलंगुटकर, तिसरे बक्षीस कविता तळकर आणि उत्तेजनार्थ शिल्पा नासनोळकर यांना मिळाले .फुलांपासून वेणी बनवण्याच्या स्पर्धेमध्ये पहिले बक्षीस सुनंदा मालकर दुसरे बक्षीस सपना सामंत ,तिसरे बक्षीस शिल्पा नाईक यांनी पटकावले .फुलांची वेणी बनवण्याच्या स्पर्धेचे परीक्षक शिल्पा नायक आणि अश्विनी साळगावकर या होत्या .पाककृती स्पर्धेचे परीक्षक विद्या राणे आणि राखी पालेकर या होत्या . हा सेल्फ हेल्प ग्रुप गेली सतरा वर्ष कार्यरत आहे याचे सर्व श्रेय गुरुकुल सेल्फ हेल्प ग्रुपच्या संचालिका सुषमा नार्वेकर यांना जाते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar