गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या

.

गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा व अभ्यासेतर क्षेत्रांत विशेष प्रविण्य दाखवलेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य पांडुरंग नाडकर्णी ‘विद्या भारती, गोवा’चे अध्यक्ष डॉ.सीताराम कोरगांवकर व विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार तारकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.विद्यालयाचे प्राचार्य गजानन मांद्रेकर हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
चालू शैक्षणिक वर्षात कधीही गैरहजर न राहिलेल्या, तसेच कधीही उशीरा न आलेल्या बारावीच्या वर्गातील वीस विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले.तसेच उत्कृष्ट नेता, वाचक चित्रकार,कलाकार, स्वयंसेवक, विद्यार्थी,विद्यार्थिनी, खेळाडू,संगणक ज्ञानी, विद्यार्थी गट अशी पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले.
बारावी कला शाखेची विद्यार्थिनी सबिराज युसुफ मुल्ला हिला विद्यालयाची दिवंगत विद्यार्थीनी कु.पूजा विलास पाटील स्मृती उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले.
आचार्य भक्ती बोर्डेकर यानी सूत्रसंचालन केले.
(छायाचित्र:- गणेशपुरी, म्हापसा येथील श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी गौरव सोहळ्यात सबिराज युसुफ मुल्ला हिला विद्यालयाची दिवंगत विद्यार्थिनी कु.पूजा विलास पाटील स्मृती उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार प्रदान करताना शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य पांडुरंग नाडकर्णी.सोबत इतर मान्यवर.)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें