आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा
८ मार्च २०२३ रोजी, हिमोफिलीया सोसायटी गोवा यांनी सहेली स्वयंरोजगार योजनेच्या संयुक्त विद्यमाने डिचोली येथे महिला दिनानिमित्त श्रीसिद्धिविनायक देवस्थानच्या आवारात साजरा करण्यात आला. हिमोफिलीया सोसायटी गोवाचे अध्यक्ष श्री. प्रसाद आरोलकर यांनी रक्तस्राव विकासाबद्दल माहिती दिली आणि उपस्थित महिलांना आपल्या अवतीभोवती आढळणारा लक्षणांबद्दल सतर्क राहण्यास व त्याबद्दल सोसायटीला सूचित करण्यास सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना सेनिटरी नेपकिनचे वाटप करण्यात आले. नारायण बेतकेकर यांच्यातर्फे महिला गटातील विविध स्पर्धांमध्ये विजेत्या महिलांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाची सांगता चहा नाश्त्याने झाली.