कल्टरंग-2023′ या आयआयटी गोवा फेस्टमध्ये तब्बल ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी संभाव्य स्टेम सेलदाते म्हणून केली नोंदणी*

.

*’कल्टरंग-2023′ या आयआयटी गोवा फेस्टमध्ये तब्बल ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी संभाव्य स्टेम सेलदाते म्हणून केली नोंदणी*

हे नोंदणी अभियान डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडिया या सोशल इनिशिएट पार्टनरतर्फे आयोजित करण्यात आले होते

*पोंडा, ११ मार्च २०२३:* रक्तातील स्टेम सेल दानाबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने आणि संभाव्य जीवनदाते म्हणून लोकांना नोंदणी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, डीकेएमएस बीएमएसटी फाउंडेशन इंडिया या संस्थेतर्फे स्टेम सेल दाते नोंदणी अभियान आयआयटी गोवामध्ये आयोजित ‘कल्टरंग – 2023’ विद्यार्थी महोत्सवात राबविण्यात आले.

३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी संभाव्य जीवनदाते म्हणून नोंदणी केली. डीकेएमएस-बीएमएसटी ही ना-नफा तत्वावर चालविण्यात येणारी संस्था आहे. ही संस्था रक्ताचा कर्करोग आणि रक्ताशी संबंधित आजारांसंदर्भात काम करते आणि आयआयटी गोवामध्ये सुरू असलेल्या तीन दिवसीय विद्यार्थी महोत्सवात अधिकाधिक विद्यार्थी नोंदणी करतील, अशी या संस्थेला आशा आहे.

दर पाच मिनिटांनी भारतात रक्ताचा कर्करोग किंवा थॅलेसेमिया किंवा अप्लास्टिक ॲनेमिया असलेल्या व्यक्तीचे निदान होते. यापैकी बहुतेक रुग्ण ही लहान मुले व तरुण मुले असतात. स्टेम सेल प्रत्यारोपण हाच त्यांचा जीव वाचविण्याचा मार्ग असतो. यशस्वी स्टेम सेल प्रत्यारोपणासाठी रुग्णासाठी एचएलए (ह्युमन ल्युकोसाइट अँटिजेन) मॅच होणारा दाता आवश्यक असतो. बहुतेक वेळा, जुळणाऱ्या ब्लड स्टेम सेल दात्याच्या अनुपलब्धतेमुळे अशा रुग्णांना प्रत्यारोपण उपलब्ध होत नाही. ब्लड स्टेम सेल दाते म्हणून नोंदणी करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे रुग्णांशी जुळणारे दाते मिळण्याची शक्यताही कठीण असते. त्यामुळे भारतीय वंशाच्या अधिकाधिक व्यक्तींनी स्टेम सेल नोंदणी करणे आवश्यक आहे.

डीकेएमएस बीएसएसटी फाउंडेशन इंडियाचे सीईओ पॅट्रिक पॉल म्हणाले, “भारतीय वंशाच्या रुग्णांमध्ये आणि दात्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे एचएलए गुणधर्म आहेत. जागतिक डेटाबेस पाहता हे गुणधर्म अत्यंत कमी प्रमाणात आढळतात. त्यामुळे सुयोग्य दाता शोधणे अजूनही कठीण होऊन जाते. रजिस्ट्रीमध्ये भारतीय लोकसंख्येचे प्रमाण नगण्य आहे. भारतात तरुणांची संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ब्लड स्टेम सेल डोनेशनबद्दल जागरुकता वाढविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

आयआयटी गोवाच्या फॅकल्टी अॅडव्हायझर कल्चरल्स डॉ. दिव्या पद्मनाभन म्हणतात, “कल्टरंग-2023 हा महोत्सव डीकेएमएस-बीएमएसटीचा सोशल इनिशिएटिव्ह पार्टनर म्हणून सहयोग करत असल्याचे तुम्हाला सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे. रक्ताचा कर्करोग झालेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी ही संस्था करत असलेले प्रयत्न बहुमूल्य आहेत. या चांगल्या कामासाठी आपल्या सोबतच्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याची आजच्या तरुणांमध्ये निश्चितच क्षमता आहे. जीव वाचविण्याला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि एक शैक्षणिक संस्था म्हणून ब्लड स्टेम सेल डोनर म्हणून नोंदणी करण्याबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या आणि रुग्णाच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या कामाचा भाग होत आले, याचा आम्हाला आनंद आहे.”

ब्लड स्टेम सेल दान करून एका व्यक्तीचा जीव वाचविलेला 24 वर्षीय प्रज्लवलही या ठिकाणी उपस्थित होता. त्याने आपला अनुभव सांगितला आणि संभाव्य जीवरक्षक म्हणून नोंदणी करण्यासाठी त्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

पाट्रिक पॉल पुढे म्हणाले, “नोंदणी अभियान आयोजित करण्यासठी आम्हाला मदत करण्यासाठी आयआयटी गोवा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे आम्ही आभारी आहोत. देशभरातील विविध महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारची जागरुकता व नोंदणी अभियाने आयोजित करण्याचे डीकेएमएस-बीएमएसटी या संस्थेचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हेतू आहे. कारण ते रजिस्ट्रीमध्ये दीर्घ कालावधीपर्यंत असतात आणि एखाद्या रुग्णासाठी ‘मॅच’ असण्याची शक्यता जास्त असते.”

संभाव्य स्टेम सेल दाता म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्ही 18 ते 55 या वयोगटातील सुदृढ भारतीय असणे अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही नोंदणी करण्यास तयार असता तेव्हा तुम्हाला संमती अर्ज भरायचा असतो आणि तुमच्या ऊती पेशी (टिश्यू सेल्स) गोळा करण्यासाठी गालाच्या आत कापसाचा बोळा फिरवायचा आहे. तुमचा टिश्यूचा नमुना प्रयोगशाळेत पाठवून त्याचे विश्लेषण करण्यात येते आणि स्टेम सेल दात्यांशी मॅच करण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय सर्च प्लॅटफॉर्मवर तो अज्ञातपणे समाविष्ट केला जातो.

जगभरातील स्टेम सेल दाता केंद्रे आणि रजिस्ट्रींमध्ये 4 कोटींहून अधिक संभाव्य अनरिलेटेड डोनर्स (प्राप्तकर्त्याच्या जवळच्या नात्यातील नसलेले दाते) आहेत. त्यांच्यापैकी केवळ 0.04% भारतीय आहेत. भारतातील अधिकाधिक सांभाव्य ब्लड स्टेम सेल दात्यांची नोंदणी करून हे चित्र बदलता येईल. तुम्ही पात्र असाल तर www.dkms-bmst.org/register या वेबसाइटवरून तुमचे होम स्वॅब कीट मागवून ब्लड स्टेम सेल डोनर म्हणून नोंदणी करण्यासाठी पहिले पाऊल उचला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar