रोटरी डिस्ट्रिक्ट 3141’ने अल्फा डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स- द पोलारीस’चे केले आयोजन विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि देशभरातील शंभर क्लबमधील प्रतिनिधी गोवा येथे झाले सहभागी

.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3141’ने अल्फा डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स- द पोलारीस’चे केले आयोजन
विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि देशभरातील शंभर क्लबमधील प्रतिनिधी गोवा येथे झाले सहभागी

पणजी: ‘रोटरी डिस्ट्रिक्ट 3141’ने अल्फा डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स- द पोलारीस’चे आयोजन केले गेले. विविध क्षेत्रांतील तज्ञांबरोबरच देशभरातील तब्बल १०० क्लबमधून रोटेरियन प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते आणि त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये भविष्यकालीन संधी या विषयावर चर्चा केली. २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी ताज रिसॉर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर, गोवा येथे ही परिषद डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप अगरवाला आणि यजमान क्लबचे प्रेसिडेंट विनीत भटनागर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली गेली. या परिषदेचे संपूर्ण उद्दिष्ट हे देशाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या विविध सामाजिक आणि औद्योगिक विषयांवर चर्चा व उपाय हे होते. रोटरी इंटरनॅशनल अध्यक्ष प्रतिनिधी कॅटरिना कोटसाली पापाडीमीट्रीयुम्हणाल्या, “रोटरीमध्ये आम्ही आमची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतो. रोटरी ही एक जादू आहे. रोटरी सर्व अडथळे दूर करते आणि तत्वे व नवीन संधी यांवर भर देते.”

रोटरी डिस्ट्रिक्ट3141गव्हर्नर संदीप अगरवाला म्हणाले, “रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर वन हा ११८ वर्षे जुन्या रोटरी इंटरनॅशनलचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. रोटरी इंटरनॅशनलमध्ये २०० देशांमधील १,४०,००० सदस्य कार्यरत आहेत.संस्था १००बेडने सुसज्ज असे एक व्यवस्था म्हाडाच्या मदतीने गरीब आणि गरजू रुग्णांसाठी तयार करत आहे. टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी धर्मशाला म्हणून या संस्थेचा वापर होणार आहे. त्याशिवाय पालघरमध्ये आम्ही एक कम्युनिटी सेंटर तयार करत असून त्या माध्यमातून तब्बल २०,०००कुपोषित मुलांना तसेच स्तनदा आणि गरोदर स्त्रियांना मध्यान्ह भोजन दिले जाणार आहे.” रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे यजमान अध्यक्ष विनीत भटनागर म्हणाले, “स्वार्थाच्या पुढे जाऊन समाजासाठी काम करण्याची जी आमची तत्त्वे आहेत ती प्रेरित करणारी आहेत. यात सातशेहून अधिक रोटेरियन आणि त्यांचे भागीदार सहभागी झाले होते. ही परिषद २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी ताज रिसॉर्ट अँड कॉन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती.”डिस्ट्रिक्टगव्हर्नर अगरवाला यांनी पुढे असे म्हटले की,“रोटरीचा सर्वात महत्त्वाचा भर हा पृथ्वीचे संवर्धन, लहान मुलांचे आरोग्य आणि त्यांच्यावरील उपचार, मुलींचे सबलीकरण, शिक्षण आणि साक्षरता कार्यक्रम, समाज विकास, माता आणि मुलांचे आरोग्य, रोगप्रतिबंधक उपाय व उपचार, पाणी आणि स्वच्छता तसेच शांतता व तंटानिवारण आणि त्यांची सोडवणूक या गोष्टींवर असणार आहे.”

दोन दिवस चाललेल्या आणि खचाखच कार्यक्रमाने भरलेल्या या परिषदेमध्ये चर्चा आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टींचा मिलाफ होता. समाजाप्रती सेवा या उद्दिष्टाने हे आयोजन होते. आरआय प्रेसिडेंट प्रतिनिधी कॅटरिना कोटसाली पापाडीमीट्रीयु या सहभागी झाल्या होत्या आणि त्या ग्रीसहून आल्या होत्या. त्याशिवाय जनरल मनोज नवराने, निवृत्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; इंडियन हॉटेल्सचे व्यवस्थापकिय संचालक पुनीत छटवाल; मेवाडचे महाराज कुमार साहिब लक्षराज सिंग; प्रख्यात शेप रितू दालमिया; अकरा वर्षीय भारतीय वातावरणीय बदल कार्यकर्ता लिसिप्रिया कान्गुजम, एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंटच्या व्यवस्थापक संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवनीत मुन्होत, सेन्ट्रम ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष जसपाल बिंद्रा; ओखार्ट लिमिटेडचे हबीब खोराकीवाला आणि विश्वविख्यात बीबीसी कमेंटेटर आणि संपादक संजीव श्रीवास्तव आदी मान्यवर परिषदेमध्ये वक्ते म्हणून सहभागी झाले होते.

विविध क्षेत्रातील तज्ञांबरोबरच या परिषदेमध्ये रोटेरियन मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते आणि त्यांनी समाजाचे भविष्य कशाप्रकारे अधिक विस्तृत होईल यावर चर्चा केली. डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स (डीस्कॉन)ला रोटरी इंटरनॅशनलच्या सदस्य कॅटरिना कोटसाली पापाडीमीट्रीयु, इमिडीयट रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट शेखर मेहता,डिस्ट्रिक्टगव्हर्नर संदीप अगरवाला, फर्स्ट लेडी मालिनी अगरवाला, रोटरी इंटरनॅशनल अधिकारी – टीआरएफ विश्वस्त डॉक्टर भारत पंड्या, आरआय डायरेक्टर डॉक्टर महेश कटबागी, आरआय डायरेक्टर इलेक्ट अनिरुद्ध रॉयचौधरी, पास्ट डायरेक्टर कमल संघवी आणि डिस्टि्क्ट3141 व रोटरी वर्ल्डचे विविध प्रतिनिधी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Marathi Photo caption
यजमान क्लबचे अध्यक्ष विनीत भटनागर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदिप अग्रवाला, रोटरीच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षांचे प्रतिनिधी- ग्रीसच्या कॅटेरिना कोतसाली पापादिमित्रीऊ, फर्स्ट लेडी मालिनी अग्रवाला आणि श्री पापादिमित्रीउ अल्फा जिल्हा परिषदेत – द पोलारिस या परिषदेत उपस्थित होते.25 आणि 26 फेब्रुवारी रोजी ताज रिसॉर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर, गोवा येथे रोटरी डिस्ट्रिक्ट द्वारे आयोजित विविध क्षेत्रातील तज्ञ 3141 देशभरातील 100 क्लबमधील रोटेरियन प्रतिनिधींनी भाग घेतला आणि विविध क्षेत्रातील भविष्याची पुनर्कल्पना यावर चर्चा केली. या परिषदेत समाज आणि देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विविध सामाजिक आणि औद्योगिक पैलूंवर चर्चा करून त्यावर उपाय शोधण्याचा निर्धार करण्यात आला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar