आरबीएल बँकेने गोव्यातील वंचित मुलींना २५० सायकली आणि शालेय किट्सचे वाटप

.

आरबीएल बँकेने गोव्यातील वंचित मुलींना २५० सायकली आणि शालेय किट्सचे वाटप केले
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आरबीएल बँकेने त्यांच्या सीएसआर उपक्रम उम्मीद १००० च्या अंतर्गत मुलींच्या शिक्षणाच्या कारणास पाठिंबा दिला.
भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये १००० हून अधिक सायकली आणि शाळेचे कीट देणगी म्हणून देण्यात आले.
गोवा, मार्च १३,२०२३: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आरबीएल बँकेने त्यांच्या सीएसआर उपक्रम उम्मीद १००० च्या अंतर्गत गोव्यातील वंचित मुलींसाठी २५० सायकलींचे वाटप केले. गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉ. प्रमोद सावंत आणि आरबीएल बँकेचे वरिष्ठ प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बँकेचा हा देणगी वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
सायकल स्वीकारण्यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशन ग्राउंडवर जमलेल्या मुलींनी मोठा उत्साह दाखवला. लाभार्थ्यांची निवड थेट बँकेकडून गोवा समाजकल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने केली गेली.
मुले शाळा सोडण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे अंतर. या उपक्रमामुळे शिक्षणात प्रवेश वाढवण्यासाठी वाहतुकीची अत्यंत आवश्यक साधने उपलब्ध होतील. ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणीय दृष्टीने शाश्वत असे दोन्ही दृष्टीने सायकली मुलींना शाळेत जाण्यास मदत करतील. बँक गोवा, हैदराबाद, रायपुर, चेन्नई, कोल्हापूर, गुवाहाटी, कोलकाता आणि सिलीगुडीसह भारतभर १००० हून अधिक सायकली आणि शालेय किट्स वितरित करीत आहे.
या उपक्रमावर भाष्य करताना आरबीएल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर सुब्रमण्यकुमार म्हणाले, “कम्युनिटी एज द कॉज’ या आमच्या ध्येयसाठी आम्ही आमच्या अनोख्या सीएसआर उपक्रमांद्वारे वंचित समुदायाला मदत करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. संपूर्ण जगभरात शिक्षण ही मुलींच्या उज्जवल भवितव्याची गुरुकिल्ली आहे. शिक्षणाची सोय करून लहान व तरुण मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यापासून रोखणारे अडथळे आपण दूर करू शकतो.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar