आयआरसीटीसीने भारतातील सर्वात फायदेशीर को-ब्रॅण्‍डेड ट्रॅव्‍हल क्रेडिट कार्ड लॉन्‍च करण्‍यासाठी एचडीएफसी बँकेसोबत केला सहयोग*

.

*आयआरसीटीसीने भारतातील सर्वात फायदेशीर को-ब्रॅण्‍डेड ट्रॅव्‍हल क्रेडिट कार्ड लॉन्‍च करण्‍यासाठी एचडीएफसी बँकेसोबत केला सहयोग*

India, २०२३: इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्‍ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) हा रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि एचडीएफसी बँक ही भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक यांनी आज भारतातील सर्वात फायदेशीर को-ब्रॅण्‍डेड ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली. आयआरसीटीसी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड म्हणून ओळखले जाणारे हे नव्याने लॉन्च केलेले को-ब्रॅण्‍डेड कार्ड सिंगल व्‍हेरिएण्‍टमध्‍ये आहे आणि फक्‍त एनपीसीआयच्‍या रुपे नेटवर्कवर उपलब्ध आहे.

हे कार्ड आयआरसीटीसीच्या तिकीट वेबसाइट व आयआरसीटीसी रेल कनेक्‍ट अॅपद्वारे बुक केलेल्या ट्रेन तिकिटांच्या बुकिंगवर विशेष फायदे आणि जास्तीत-जास्त बचत प्रदान करेल. याव्यतिरिक्त, आयआरसीटीसी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डधारकांना आकर्षक जॉइनिंग बोनस, बुकिंगवर सवलत आणि देशभरातील रेल्वे स्थानकांवर अनेक कार्यकारी लाउंजमध्ये प्रवेश मिळेल.

हे कार्ड प्रवाशांना उच्‍च दर्जाचे मूल्‍य व सुधारित ग्राहक अनुभव देण्‍यासाठी दोन अग्रगण्‍य भारतीय ब्रॅण्‍ड्सच्‍या सामर्थ्‍यांना एकत्र करते. हे कार्ड देशामध्‍ये कार्ड जारी करण्‍यात बाजारपेठ अग्रणी असलेल्‍या एचडीएफसी बँकेच्‍या कौशल्‍याचा लाभ घेईल, ज्‍यामधून दर्जात्‍मक रिवॉर्ड्स प्रोग्राम आणि रेल्‍वे प्रवासावर आयआरसीटीसीच्‍या अद्वितीय सेवा दिल्‍या जातील.

आयआरसीटीसीच्‍या अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रीम. रजनी हसिजा, एचडीएफसी बँकेचे पेमेंट्स, कंझ्युमर फायनान्‍स, डिजिटल बँकिंग व आयटीचे ग्रुप हेड श्री. पराग राव आणि एनपीसीआयच्‍या सीओओ श्रीम. प्रवीणा राय यांच्‍या हस्‍ते नवी दिल्‍ली येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या अनावरण समारोहामध्‍ये हे क्रेडिट कार्ड लॉन्‍च करण्‍यात आले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar