गुढीपाडवा हा नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोनांतून महत्त्वाचा ! – राजश्री गडेकर, हिंदु जनजागृती समिती*

.

_

 

*गुढीपाडवा हा नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोनांतून महत्त्वाचा ! – राजश्री गडेकर, हिंदु जनजागृती समिती*
पेडणे, १८ मार्च – हिंदु धर्मात गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाल्याने हा अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला वर्षारंभ करणे अर्थात गुढीपाडवा साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणास्तव महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोरजी, पेडणे येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित एका प्रवचनामध्ये सौ. राजश्री गडेकर यांनी ही माहिती दिली.
सौ. राजश्री गडेकर पुढे म्हणाल्या,‘‘शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसत असते. यामुळे गुढीपाडव्याला नैसर्गिकदृष्ट्या महत्त्व आहे. रामाने वालीचा वध केल्याचा दिवस, राम रावणवधानंतर अयोध्येत परतल्याचा दिवस, शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस आदी कारणांमुळे गुढीपाडवा साजरा केला जातो. यामुळे गुढीपाडव्याला ऐतिहासिक कारणे आहेत. सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाचा प्रारंभाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा होय! गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी कोणतीही घटिका हा शुभमुहूर्तच असतो. चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस प्रत्येक पाऊल समृद्धीकरता पुढे टाकण्याची शिकवण देणारा आहे. या दिवशी शुभसंकल्प केल्यास, तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. हिंदु धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म आहे. यंदाच्या वर्षी गुढीपाडव्याला हिंदु कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२५ व्या वर्षाचा आरंभ होत आहे. (१ खर्व म्हणजे १०० सहस्र लक्ष वर्षे, तर १ निखर्व म्हणजे १० सहस्र कोटी वर्षे)’’. या वेळी शास्त्रोक्त पद्धतीने गुढी कशी उभारावी? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा ४६ जिज्ञासूंनी लाभ घेतला. प्रवचनाच्या अखेर ‘ब्लॉक रिसोर्स पर्सन’ सौ. नयनी शेटगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रवचनाचे आयोजन करण्यासाठी महिला सहकारी संघाच्या अध्यक्षा सौ. हेमश्री गडेकर यांचा चांगला प्रतिसाद दर्शवला. हिंदु जनजागृती समितीने अशाच प्रकारे तुये, पेडणे येथील ग्रामपंचायत सभागृह, साईनगर-हळदोणा येथील श्री साईबाबा मंदिर आदी ठिकाणी ‘गुढीपाडवा : हिंदु नववर्षाचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर प्रवचने घेतली. या उपक्रमांचा २२० हनू अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. हिंदु जनजागृती समिती सार्वजनिक ठिकाणी फलक प्रदर्शनाच्या माध्यमातूनही ‘गुढीपाडवा : हिंदु नववर्षाचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर जागृती करत आहे.

आपला नम्र,
*डॉ. मनोज सोलंकी,*
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar