*हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वेर्ला, बार्देश येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन*_

.

 

_*हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वेर्ला, बार्देश येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन*_

*हिंदूंनी अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूसंघटन करणे, ही काळाची गरज ! – श्री. नीरज अत्री, अध्यक्ष, स्वामी विवेकानंद केंद्र, देहली*
म्हापसा, १८ मार्च – हिंदु समाजाचे अस्तित्व आज विविध माध्यमांमुळे धोक्यात आलेले आहे. हिंदूंनी अस्तित्व टिकवण्यासाठी जात, पात या बिरूदावली बाजूला सारून संघटीत होणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन देहली येथील स्वामी विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कलांगण सभागृह, वेर्ला, बार्देश येथे ‘जिहादी मानसिकतेच्या विरोधात कसे लढावे?’ या विषयावर आयोजित केलेल्या एका विशेष व्याख्यानात श्री. नीरज अत्री मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांची उपस्थिती होती.
श्री. नीरज अत्री आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले,‘‘प्रारंभी मोगलांनी आणि नंतर ब्रिटीशांनी भारतावर आक्रमण करून हिंदू धर्मीय आणि हिंदु धर्म यांवर अनन्वित अत्याचार केले आहेत. आजही धर्मांधांनी भारतात आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न चालू केल्याने देशात हिंदु दिवसेंदिवस अल्पसंख्याक होत चालले आहेत. धर्मांधांच्या वाढत्या संख्येमुळे भारत गृहयुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या परिस्थितीला तोंड देऊन हिंदूंचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे ही आज काळाची गरज बनली आहे’’. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, उद्देश व आभार श्री. गोविंद चोडणकर यांनी केले. हे व्याख्यान प्रश्नोत्तराच्या माध्यमातून घेण्यात आले. उपस्थितांनी व्याख्यानाला चांगला सहभाग घेतला.

आपला नम्र,
*डॉ. मनोज सोलंकी,*
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar