मांद्रे येथील ‘साहित्य संगम’चा तीनशे चौऱ्याण्णव्वा मासिक कार्यक्रम मधलावाडा, पालये येथे महेंद्र देवानंद परब यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.
या कार्यक्रमात सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध अभिनेते सुधीर श्रीपाद धुमे यांच्याशी गप्पा मारण्यात आल्या.
सुधीर धुमे यानी आपल्या नाट्यप्रवासाविषयी, तसेच ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील अभिनयासंदर्भात माहिती दिली.नाटकांच्या दरम्यान घडलेले विनोदी किस्सेही त्यानी आपल्या खास शैलीत कथन करून उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
हसण्याने माणसाचं आयुष्य वाढते, त्यामुळे लोकांना हसवणे आपल्याला आवडते,असे त्यानी यावेळी बोलताना सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘साहित्य संगम’चे कार्यवाह प्राचार्य गजानन मांद्रेकर यानी स्वागत व प्रास्ताविक करून ‘साहित्य संगम’च्या तेहेतीस वर्षांच्या अखंडित प्रवासाविषयी माहिती दिली.पालये येथील ज्येष्ठ नागरिक एकनाथ परब यानी पुष्पगुच्छ देऊन सुधीर धुमे यांचे स्वागत केले.अध्यक्ष सुभाष शेटगांवकर यानी ऋणनिर्देश केला.
कार्यक्रमास मानसी शेटमांद्रेकर, राजेंद्र परब,भोलेश नाईक, दिलीप मेथर,रामा गावडे, पांडुरंग गावडे,सिध्देश परब, महेंद्र परब,अर्चना परब,प्रगती परब, नारायण सावंत, तुकाराम परब,शंकर चोडणकर,शरद गावडे, आत्माराम परब,ममता परब, सहदेव परब,तन्वी परब हे रसिक उपस्थित होते.
(छायाचित्र:-मांद्रे येथील ‘साहित्य संगम’च्या मासिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते सुधीर धुमे यांच्यासमवेत सुभाष शेटगांवकर, गजानन मांद्रेकर, एकनाथ परब व इतर.)
मांद्रे येथील ‘साहित्य संगम’चा तीनशे चौऱ्याण्णव्वा मासिक कार्यक्रम मधलावाडा, पालये येथे महेंद्र देवानंद परब यांच्या निवासस्थानी संपन्न

.
[ays_slider id=1]