संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान बक्षीस वितरण सोहळा

.

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान बक्षीस वितरण सोहळा
पर्वरी ता.20(प्रतिनिधी)एखाद्या देशाची परकीय आक्रमणामुळे भूमी,सत्ता ,धन गेले तरीही काहीच नुकसान होत नाही ते शौर्य,पराक्रम,परिश्रम याने परत मिळविता येते पण जर एखाद्या देशाची संस्कृती नष्ट झाली तर देश रसातळाला जाण्यास वेळ लागत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या देशाच्या संस्कृतीचे जतन,संवर्धन आणि त्यानुसार आचरण केले पाहिजे. असे उद्गार गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर यांनी काढले.
येथील विद्या प्रबोधिनी विद्यालयाच्या सभागृहात संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेने आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, विश्व हिंदू परिषद उत्तर गोवा  अध्यक्ष प्रमोद सांगोडकर , संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष नाईक,मोहन आमशेकर,भारत बेतकेकर ,कुसूम साळकर,मोहन सालेकर उपस्थित होते.
भारत देशाचे नुकसान जितके परकीय आक्रमणामुळे झाले नसेल तितके आजच्या शिक्षण पद्धतीमुळे झाले आहे. आज शाळा मधून आम्ही केवळ परिक्षार्थी निर्माण करतो. गुणासाठी शाळा शाळा मध्ये गळे कापू स्पर्धा सुरू आहे. शाळा मधून विचारांचे बिजारोपण करणे ,चरित्र निर्माण करणे या शिक्षणाच्या मूळ हेतु पासून आम्ही दूर चाललो आहे. त्यामुळे कुटुंब विस्कळीत झाली आहेत. आज आम्ही केवळ नावाने भारतीय आहोत संस्कारच्या दृष्टीने आम्ही पश्चिमात्माचे अनुकरण करतो. हे चित्र बदलण्यासाठी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानाची स्थापना करण्यात आली आहे. असे उद्गार मोहन सालेकर यांनी काढले. यावेळी संजय वालावलकर, संतोष नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरवातीला दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात झाली. मुलांनी यावेळी संस्कारक्षम कथा सांगितल्या. सर्व विजेत्याना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रधान करण्यात आली.
फोटो ओळी: दीप प्रज्वलित करताना गोविंद पर्वतकर,सोबत संजय वालावलकर, प्रमोद सांगोडकर , संतोष नाईक,मोहन आमशेकर,भारत बेतकेकर ,कुसून साळकर,मोहन सालेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar