प्रख्यात उद्योगपती श्री. कुमार मंगलम बिर्ला यांना आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार

.

प्रख्यात उद्योगपती श्री. कुमार मंगलम बिर्ला यांना आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. बिर्ला यांना त्यांच्या व्यापार आणि उद्योगातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्धल श्री. बिर्ला म्हणाले, “राष्ट्र उभारणी आणि विश्वस्ततेच्या भावनेने माझ्या कुटुंबाला पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन केले आहे. आणि म्हणून, हा राष्ट्रीय सन्मान मिळणे हे खरोखरच सुखद आणि विनम्र करणारे आहे. वेगवेगळ्या ३६ देशांमध्ये असलेल्या माझ्या १४०,००० सहकाऱ्यांच्या वतीने मी स्वीकारत असलेल्या या प्रतिष्ठित सन्मानाबद्दल भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो. आहे आदित्य बिर्ला समूहाने एक मोठ्या काळापासून- लोकांचे जीवन समृद्ध करण्यात आणि उद्योग व्यवसाय हे उत्तमाच्या ध्यासासाठी एक शक्ती आहे हे प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवण्यासाठी- जो प्रभाव पाडला आहे त्या प्रभावाची हा पुरस्कार म्हणजे एक पोचपावती आहे.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar