अटल सेतूच्या मुद्द्यावरून युथ काँग्रेसची भाजपवर टीका

.

अटल सेतूच्या मुद्द्यावरून युथ काँग्रेसची भाजपवर टीका

पणजी ः अटल सेतूच्या दुरुस्तीच्या कामामुळे पणजीत वाहतुक कोंडी प्रचंड वाढली आहे. पुलासाठी खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले, अशी घणाघाती टीका गोवा युथ काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष रिनाल्डो रोझारियो यांनी केली आहे. भाजप सरकारने अटल सेतूसाठी 600 कोटींपेक्षा अधिक पैसे खर्च केले. जानेवारी 2019 मध्ये पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर या पुलावर वर्षभरात अनेक खड्डे पडले, असे रिनाल्डो म्हणाले.
पोर्तुगीजांनी बांधलेले पूल अजुनही सुस्थितीत आहेत. भाजपच्या कार्यकाळातील रस्ते व पुलांचटी मात्र वर्षभरातच डागडुजी करावी लागत आहे.
‘अटल सेतू’ हा गोव्याची ओळख बनविण्यासाठी सरकार धडपडत होते. परंतु, खूप कमी कालावधी लोटलेला असताना या पुलाची दैना झाली आहे.
सरकारच्या सुस्त कारभाराची सर्वाधिक किंमत पर्वरीवासीयांना मोजावी लागत आहे. पर्वरी ते मेरशीपर्यंत अटल सेतूचा एक पट्टा दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याने याचा फटका बसत आहे.
ऑफिसमध्ये जाणारे कर्मचारी, उद्योजक तसेच विद्यार्थ्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे. कित्येक तास वाहने पर्वरीत अडकून पडत आहेत. सरकार त्यांचे दुखणे कमी करण्यासाठी कोणती पावले उचलत आहेत, असे संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे.
राजधानीचा श्वासदेखील कित्येक महिने कोंडलेला आहे. अनेक रस्ते खोदलेले असल्याने तसेच दुरुस्ती, डांबरीकरणाच्या नियोजनशून्य कामांमुळे प्रवाशी, चालकांना जीव मुठीत धरावा लागत आहे.
मागील काही दिवसांपासून पणजीने वाहतूक कोंडीचा कळस गाठला आहे. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे तसेच जी20 समीटमुळे रस्त्यांचे सुरू असलेली डांबरीकरण ही वाहतूक कोंडी होत आहे.
काही रस्त्यांवर तर वाहतूक पोलीस दुसरीकडून वाहने वळवत आहेत. त्यामुळे निश्चित ठिकाणी जाण्यासाठी चालकांना वळसा घालावा लागत आहे. अधिकार्‍यांच्या कठोर वागण्यांमुळे सामान्य लोक भरडले जात आहेत. सरकारी बाबू मात्र आनंद लुटत आहेत.
मंगळवारी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेचा व्हिडिओ रिनाल्डो यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. रुग्णांना इस्पितळ गाठण्यासाठी करावी लागणारी कसरत यामधून दिसत होती. दुसरीकडे सरकारी वाहनांसाठी दोन पोलिस गाड्या वाहतूक मोकळी करतानाचा व्हिडिओदेखील त्यांनी प्रसारित केला होता.
‘या भाजप सरकारला सामान्य माणसाशी देणेघेणे नाही. सरकार जाणुनबुजून सामान्य लोकांचे गार्‍हाणे ऐकत नाही. सामान्य माणसांच्या समस्यांबाबत सरकारमध्ये उदासीनता आहे, असे रिनाल्डो म्हणाले.
निकृष्ट कामावर पडता टाकणसाठी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यावरही त्यांनी यावेळी जाब विचारला आहे. निकृष्ट काम करणार्‍यांनी ते दुरुस्त करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे रिनाल्डो म्हणाले. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले तरच जनसामान्यांमध्ये योग्य संदेश जाईल, असे रिनाल्डो म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar