महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आयर्लंडमध्ये ‘व्यसनाधीनता’ या विषयावर शोधनिबंध सादर !_* *साधनेद्वारे व्यसनाधीनतेवर कमी कालावधीत मात करता येते

.

 

*_‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आयर्लंडमध्ये ‘व्यसनाधीनता’ या विषयावर शोधनिबंध सादर !_*

*साधनेद्वारे व्यसनाधीनतेवर कमी कालावधीत मात करता येते !* – संशोधनातील निष्कर्ष

अध्यात्मिक संशोधनातून असे दिसून आले आहे की एखाद्या व्यसनांची 30 टक्के कारणे शारीरिक असतात, म्हणजे व्यसनाधीन पदार्थांवर अवलंबून असतात, तर 30 टक्के मानसिक आणि 40 टक्के ही आध्यात्मिक असतात. अध्यात्मशास्त्रानुसार योग्य आध्यात्मिक साधना केल्यास व्यसनावर कमी कालावधीत मात करता येते. तसेच व्यसनांवर पूर्णपणे मात करण्याचे आध्यात्मिक साधना हे एक अतिशय शक्तिशाली साधन आहे’, *असे ‘महर्षी अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने श्री शॉन क्लार्क यांनी सांगितले.*

ते डब्लिन, आयर्लंड येथे नुकतेच ‘कॉन्फरन्स सिरीज’ने आयोजित केलेल्या 10 व्या ‘वार्षिक काँग्रेस ऑन मेंटल हेल्थ’ (ए.सी.एम्.एच. 2023) या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत बोलत होते. श्री. क्लार्क यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने *‘आध्यात्मिक कारणांमुळे व्यसने कशी जडतात आणि त्यावर मात कशी करावी?’* या विषयावर 102 वा शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटातील श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

*श्री. क्लार्क म्हणाले की,* नकारात्मक शक्तींचा प्रभाव किंवा अतृप्त पूर्वजांमुळे होणारे त्रास हे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात, तसेच ते त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ वाढवण्यात कारणीभूत ठरतात. तथापि, एखाद्या व्यक्तीने आध्यात्मिक साधना चालू केली की, त्याची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अल्प होऊ लागते. श्री. क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यु.ए.एस्.) या उपकरणांद्वारे प्रयोग करून काढलेल्या निष्कर्ष या परिषदेत सादर केले. या प्रयोगांमध्ये फ्रान्समधील एका संतांच्या तीन चित्रांची प्रभावळ मोजण्यात आली. पहिले, साधना चालू करण्यापूर्वी जेव्हा त्यांना सिगारेटचे व्यसन होते. दुसरे, आध्यात्मिक साधना चालू केल्यानंतर आणि तिसरे, आध्यात्मिक प्रगती करून संत झाल्यानंतरचे होते. यातील निष्कर्षांवरून असे आढळून आले की, ज्या पहिल्या चित्रात त्यांना सिगारेटचे व्यसन होते त्यात नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोठ्या प्रमाणात आढळली. दुसर्‍या चित्रात, त्यांची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अर्ध्याने अल्प झाली, तर संत झाल्यानंतर काढलेल्या त्यांच्या तिसर्‍या चित्रात सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोठ्या प्रमाणात आढळून आली. या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयामध्ये आध्यात्मिक साधना करून काही महिने किंवा वर्षांमध्ये व्यसनांवर मात केलेल्या साधकांच्या चाचणीची उदाहरणे या वेळी देण्यात आली.

*या सर्व प्रयोगांचे निष्कर्ष मांडतांना श्री. क्लार्क म्हणाले की,* जर वैद्यकीय समुदायाला समाजाचे मानसिक आरोग्य सुधारायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या संशोधनात आध्यात्मिक परिणाम समाविष्ट केले पाहिजे आणि त्यांच्या उपचार पद्धतीमध्ये आध्यात्मिक साधनांचा वापर केला पाहिजे; कारण मानवाच्या कल्याणासाठी अध्यात्म अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपला नम्र,
*श्री. आशिष सावंत,*
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.
(संपर्क : 95615 74972)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें