एयर इंडिया एक्सप्रेसतर्फे गोवा ते दुबई मार्गावर थेट विमानसेवा लाँच

.

एयर इंडिया एक्सप्रेसतर्फे गोवा ते दुबई मार्गावर थेट विमानसेवा लाँच


गोवा ते दुबई थेट विमानसेवा सोमवार, गुरुवार, शनीवार आणि रविवारी, तर परतीची विमानसेवा बुधवार, शुक्रवार, शनीवार आणि रविवारी

गोवा, २७ मार्च २०२३ – एयर इंडिया एक्सप्रेस या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बजेट विमानसेवेने गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (दाबोलिम विमानतळ) कामकाज सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार गोवा- दुबई मार्गावर चार साप्ताहिक विमानसेवा कार्यान्वित होणार आहे. IX 840 या पहिल्या विमानाने सोमवारी पहाटे १.०० वाजता १४० प्रवाशांसह उड्डाण केले.

याप्रसंगी एयर इंडिया एक्सप्रेस आणि एयरएशिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंग म्हणाले, ‘एयर एक्सप्रेस बॅनरअंतर्गत गोव्याहून पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. दुबई ते गोवा मार्गावर थेट कनेक्टिव्हिटी पुरवणारी पहिली विमानसेवा असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. एयरएशिया इंडियाचे एयर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलिनीकरण होणार असून ही कंपनी सध्या गोव्यापासून आणि गोव्यापर्यंत दैनंदिन १३ विमानसेवा पुरवत पाच देशांतर्गत शहरे जोडत आहे. या राज्याच्या पर्यटन विकासाचा भाग होण्यासाठी व ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’

एयर इंडिया एक्सप्रेसने गोव्यात प्रवेश केल्यानिमित्त संध्याकाळी सिटी हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात गोवा ट्रॅव्हल ट्रेड सहभागी झाले होते. यावेळी एयर इंडिया एक्सप्रेस आणि एयरएशिया इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वेळापत्रक – सर्व वेळा स्थानिक आहेत

क्षेत्र
निर्गमन
आगमन
कामाचे दिवस

गोवा- दुबई
पहाटे १ वाजता
पहाटे २.५५ वाजता
सोमवार, गुरुवार, शनीवार आणि रविवार

दुबई गोवा
संध्याकाळी ६.०५ वाजता
रात्री १०.५५ वाजता
बुधवार,
शुक्रवार,
शनीवार आणि
रविवार

About Air India Express:
Air India Express, launched in 2005, is India’s first international budget carrier and a wholly owned subsidiary of Air India. It meets the need for affordable services on short and medium haul routes connecting smaller Indian towns directly to the Gulf and South East Asia regions. With 19 Indian cities and 14 international destinations in its network, the airline operates more than 600 flights a week. The airline has a fleet of 26 Boeing 737-800 NG aircraft. In January 2022, Air India Express, together with Air India, was successfully privatized, with ownership returning to the Tata group that had initially founded Air India.
मीडिया संपर्क
एयर इंडिया एक्सप्रेस
अडफॅक्टर्स पीआर

प्रगीश पीजी / हरी कृष्णन pg.prageesh@airindiaexpress.in / hari.krishnan@airindiaexpress.in

अब्रेश्मिना काद्री (National)
+91-8826721799
Jeevan Chandy (Kochi):
+91-9447302033
airindiaexpress@adfactorspr.com

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar