न्यूटन स्कूलच्या भागीदारीत राज्य सरकारद्वारे ‘डिजिटल गोवा युथ परिषदे’चे आयोजन

.

*न्यूटन स्कूलच्या भागीदारीत राज्य सरकारद्वारे ‘डिजिटल गोवा युथ परिषदे’चे आयोजन *

गोवा, मार्च २८,२०२३: दि.२८ मार्च २०२३ रोजी डॉ .श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये ‘डिजिटल गोवा युथ परिषद’ आयोजित करण्यात आला, हा परिषद न्यूटन स्कूल या संस्थेने गोवा सरकारच्या उच्च शिक्षण आणि संचानालयच्या सहकार्याने आयोजित केली होता. आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाची चालना ऑक्टोबर २०२२ असून ह्या कार्यक्रमात डिजिटल गोवा स्कॉलरशिप प्रोग्रॅमचे सादरीकरण करण्यात आले .

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत कार्यक्रमस्थळी उपस्थित होते , त्यांच्या सोबतसोबत उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक श्री प्रसाद लोलयेकर आणि न्यूटन स्कूलचे संस्थापक, सिद्धार्थ माहेश्वरी आणि निशांत चंद्रा पण उपस्थ होते, तसेच झेपटो,फॅम्पे सारख्या टेक कंपन्यांसह, गुगल आणि लिंक्डइन सारख्या नामवंत कंपनींनी पण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात गोव्याचे विद्यार्थी आणि लोकप्रिय सोशल मीडिया प्रभावकार सुकृती चतुर्वेदी यांचे मनोरंजनात्मक कार्यक्रमही अनुभवता आले. राज्यातील ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी टेक उद्योग समजण्यास व उद्योगातील नवीनतम ट्रेंड आणि संधींबद्दल चर्चा करण्यास कार्यक्रमात आपली हजेरी दाखविली.

तसेच आपल्या भाषणात डॉ,प्रमोद सावंत यांनी या परिषदेच्या तुलनेत चांगला प्रतिसाद दाखविला ज्यात त्यांनी गोव्यातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान तज्ञ बनण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने हा शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केल्यास ते आनंदी आहेत असे सांगितले. शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळेल ज्यामुळे त्यांची कौशल्ये वाढतील आणि त्यांना उद्योगासाठी तयार करण्यात मदत मिळेल, अशा प्रकारे ते गोव्याच्या तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देण्यास सक्षम होतील असे पण मुख्य मंत्र्याने आपल्या भाषणात नोंदवले.

शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, न्यूटन स्कूल १२ -आठवड्याचे कोडिंग आणि माइंडसेट बूटकॅम्प आयोजित करेल. बूटकॅम्प ३१ मार्च रोजी सुरू होईल आणि प्रोग्रामिंग शिकण्यासाठी आवश्यक गणित आणि तर्कशास्त्राची योग्यता आणि के -१० स्तर विकसित करेल. बूटकॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, विद्यार्थी ६ महिन्याच्या फ्लॅगशिप कोर्सेसाठी विनामूल्य नावनोंदणी करू शकतील आणि गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ऍमेझॉन सारख्या उद्योग तज्ञांकडून शिकू शकतील . तसेच विद्यार्थ्यांना न्यूटन स्कूलच्या २००० + भागीदारांसह त्याचे टेक करिअर वाढवण्यासाठी १०० टक्के प्लेसमेंटसाठी मदत मिळेल.
तसेच कार्यक्रमाच्या संदर्भात बोलताना,न्यूटन स्कूलचे संस्थापक निशांत चंद्रा आणि सिद्धार्थ माहेश्वरी म्हणाले की डिजिटल गोवा शिष्यवृत्ती कार्यक्रम हा एक दूरदर्शी प्रकल्प आहे ज्याचा उद्देश हजारो गोव्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांची कारकीर्द घडवण्यासाठी सक्षम बनवणे आहे. न्यूटन स्कूलचे संस्थापक या नात्याने,नेहमीच महत्त्वाकांक्षी विकासक आणि कार्यरत व्यावसायिकांना दर्जेदार शिक्षण देऊन टेक उद्योगातील कौशल्याची दरी भरून काढण्याचा दृष्टिकोन ही संस्था ठेवते गोवा सरकारसोबतची भागीदारी ही भारताला जगातील टेक पॉवरहाऊस बनवण्याच्या उद्देशाने संस्थेच्या प्रवासातील एक उत्कृष्ट अनुभ आहे असे त्यांनी आपल्या वार्तात सांगितले, तसेच शैक्षणिक संस्था आणि सरकारच्या पाठिंब्याने गोव्याला नावीन्य आणि तंत्रज्ञानाचे केंद्र बनवू शकतो असे आईए एस आणि उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक श्री प्रसाद लोलयेकर यांनी जोडले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar