काळा जादू हा विज्ञानाचा खेळ आहे त्याला बळी पडू नका शिक्षक वसंत कोळंबकर

.

काळा जादू हा विज्ञानाचा खेळ आहे त्याला बळी पडू नका
शिक्षक वसंत कोळंबकर

काळा जादू हा विज्ञानाचा खेळ आहे त्याला बळी पडू नका

शिक्षक वसंत कोळंबकरअंधश्रद्धा आणि काळा जादू हे विज्ञानाचे खेळ, याला कोणीही बळी पडू नव्हे असे मराठी विज्ञान पर्शिदेचे संयोजक श्री वसंत कोळंबकर यांनी न्यू इंग्लिश हायस्कूल केरीच्या विद्यार्थी आणि पालकांना संबोधित केले.

केरी न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री वसंत कोळंबकर हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नारायण केरकर, संस्थेचे इतर कार्यकारी पदाधिकारी, पालक शिक्षक संघाचे कार्यकारी पदाधिकारी, बिंदिया पेडणेकर, डॉ. सुकन्या केरकर, शाळेची विज्ञानाची शिक्षिका सौ वैशाली, शाळेचे मुख्याध्यापक श्री भावार्थ मांद्रेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायन करून केली व कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. सी.वी.रमण यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आले.
श्री वसंत कोळंबकर यांनी विज्ञानाने काळा जादू कसा करावा हे प्रदर्शन करून दाखवले. त्यांनी विज्ञान हे कसे आपल्या जीवनात उपयोगी आहे आणि कसं आम्ही विज्ञानाने जादू करू शकता हे मुलांना दाखवले.
शाळेचा विद्यार्थी विनायक गोवेकर यांनी ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्या विषयावर पिपिटी प्रदर्शन केले होते.
या वर्षी विज्ञान दिवसानिमित्त ‘म्हादइ, आमची माय’ हा विशेष विषय होता. यावर शाळेच्या प्रशिक्षणार्थी शिक्षक गौरव किन्नरकर यांनी उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे संबोधन केले. तसेच शाळेचा हॉल म्हादई ह्या विषयावर प्रशिक्षणार्थी गौरव किन्नरकर व गंधवी वस्त ह्यांनी शाळेची शिक्षिका निशिता आकरकर ह्यांचा निर्देशानुसार केले होते.

केरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नारायण सोपटे केरकर यांनी सगळ्यांना संबोधित करिता मुलांनी विज्ञान कसे समजून घ्यावे व शाळा व देश विज्ञानाने कसे बांधून काडावे हे सांगितले.
शाळेत वीज्ञान दिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शन करण्यात आले. शाळेच्या मुलांनी वेगवेगळे कार्यरत मॉडेल व अकर्यारत मॉडेल व पोस्टर प्रदर्शित केले होते. विज्ञानाचे पुस्तक प्रदर्शन सुधा केले होते. याप्रसंगी कू. बिंदिया पेडणेकर व डॉ. सुकन्या केरकर या विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक होते.
सौ. वैशाली न्हांजी कर्यक्राची प्रभारी होती. तसेच श्रीमती निषिता आकरकर, सर्वेश कोरगावकर व यशवंत पेडणेकर यांनी कार्यक्रम घडविण्यात योगदान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी चैताली रांगणेकर हिने केले तसेच आभार प्रदर्शन यशवंत पेडणेकर यांनी केले.

फोटो
केरी पेडणे येथे विज्ञान दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसंत कोळंबकर यांचे स्वागत करताना न्यू इंग्लिश हायस्कुलचे चेअरमन नारायण सोपटे केरकर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar