महिलांनी स्वयंपूर्ण स्वावलंबी होणे अपेक्षित
शिक्षिका क्ष्मा शेमडकर यांचे केरी येथे प्रतिपादन
न्यू इंग्लिश हायस्कूल केरी येथे 08 मार्च 2023 रोजी महिला दीन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी हरमल पंचक्रोशी हायस्कूलच्या संस्कृत शिक्षिका सौ.क्ष्मा शेमडकर मुख्य अतिथी म्हणून लाभल्या होत्या.
यावेळेस विद्यालयाच्या सर्व महिला शिक्षिका व महिला कर्मचारी व्यासपीठावर उपस्थित होत्या. सर्व शिक्षिकांचे स्वागत पुष्प अर्पण करून करण्यात आले.
महिलेने स्वावलंबन, स्वयंपूर्ण आणि स्वसंरक्षण या त्री सुत्री आत्मसात करावे. महिला जर स्वयंपूर्ण होण्याच्या चाळीत आहे तर तिने स्वतः हा ध्येय पूर्ण करावा असे व्यक्त सौ.शमा शेमडकर यांनी केले.
महिलांचे अस्थित्व भूतकाळात कसे होते, महिलांचा इतिहास आणि महिला दिवस हा कसा अस्तित्वात आला याचावर विचार विमर्श झाले.
कार्यक्रमाचे स्वागत, परिचय , सूत्रसंचालन व शेवटी आभार प्रदर्शन मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी केले.
फोटो
केरी पेडणे येथे महिला दिनानिमित्त बोलताना संस्कृत शुक्षिका क्ष्मा शेमडकर. सोबत शाळेच्या शिक्षिका व महिला कर्मचारी.