म्हापसा वाताहार शिवोली सार्वजनिक गणेश विश्वस्त मंडळ श्री गणेश मंदिर शिवोली माकैट येथे हनुमान जयंती निमित्त मंगळवार दि. ४ एप्रिल रोजी मदन आगरवाडेकर तफै साप्ताहिक मंगळवार साजरा होणार आहे.
त्यानिमित्ताने सकाळी धार्मिक विधी ( यजमान किशन आगरवाडेकर) दुपारी आरती व महाप्रसाद व संध्याकाळी ७ वाजता कै. मोफिन आगरवाडेकर यांच्या स्मरणार्थ गायनाचा कार्यक्रम’ स्वराजली’यात गायक निलेश शिंदे व गायिका गितगंधा यांच्या गायनाचा कार्य त्यांना हाॅमोनियम वर रोहित खांडोळकर तर तबला साथ गोरखनाथ सावंत करतील.
बुधवार दि. ५ रोजी रात्री ६.३० वाजता अखिल गोवा वेशभूषा स्पर्धा (५ ते १२ वयोगट) प्रथम पारितोषिक रू३३३३, दुसरे २२२२, तृतीय रू११११, उतेजनाथ बक्षीस १ ले ७७७,दुसरे६६६, तृतीय ५५५, सदर बक्षीसे दिगंबर आगरवाडेकर, लक्ष्मण शेट्ये, सदाशिव आगरवाडेकर व प्रकाश ताम्हणकर यांनी पुरस्कृत केली आहेत. व तदनंतर ९ वाजता पौराणिक नाटक प्रतिशाप सादर होणार आहे, पुरस्कृत रामा परब, प्रदीप देसाई, सत्यवान मांद्रेकर, दीपक धारगळकर व रविंद्र साळगावकर
गुरूवारी ६ रोजी श्री हनुमान जयंती त्यानिमित्त ६.१५ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव, धार्मिक विधी ( पुरस्कृत गिरीश नाईक,) सदर कार्यक्रमाचे यजमान सौ व श्री रामा पेडणेकर, रात्रौ ७.३० वाजता अखिल गोवा नृत्य स्पर्धा, प्रथम पारितोषिक रू ५५५५,दुसरे रू४४४४, तिसरे रू३३३३ व इतर उत्तर बक्षीस दिली जातील. पुरस्कृते दयानंद मांद्रेकर, सोहम व सानवी चोडणकर, सुदन ताम्हणकर, रामा पेडणेकर, देवानंद पेडणेकर, भास्कर साळगावकर व दिपक धारगळकर. नृत्य व वेशभूषा स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिगंबर आगरवाडेकर-९४२०१६३१२५ , देवानंद पेडणेकर-८८८८७७६६४७, शिवा चोडणकर-९२८४३२८९६७, किंवा प्रकाश ताम्हणकर -९८२२१३३४३२ यांच्या शी संपर्क साधावा.
सर्वानी कार्यक्रम चा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष दयानंद मांद्रेकर यांनी केले आहे.
शिवोली सार्वजनिक गणेश विश्वस्त मंडळ श्री गणेश मंदिर शिवोली माकैट येथे हनुमान जयंती निमित्त मंगळवार दि. ४ एप्रिल रोजी मदन आगरवाडेकर तफै साप्ताहिक मंगळवार

.
[ays_slider id=1]