गोवा शासनाच्या क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने आयोजित केलेल्या एकोणीस वर्षांखालील राज्य स्तरीय वुशू स्पर्धेत गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी व मुलींनी उपविजेतेपद पटकावले.
क्रीडा शिक्षक अभय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत कोरगांवकर,गुलाम मसूद कुरेशी,तौफिक शेख (सर्व सुवर्णपदक विजेते) लकी कुयेल्लो (रौप्यपदक विजेता) रेहान शेख व हुसेन मिर्जी (कांस्यपदक विजेते) यांनी मुलांचे,तर श्रावणी गुरव,निशा राठोड (सुवर्णपदक विजेत्या) व जुनिता एक्का (रौप्यपदक विजेती) यानी मुलींचे प्रतिनिधित्व केले.
विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश्वर पेडणेकर, सचिव पुरुषोत्तम कामत,पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार तारकर व प्राचार्य गजानन मांद्रेकर यानी विजेत्या संघांचे व मार्गदर्शक शिक्षक अभय सावंत यांचे अभिनंदन केले आहे.
(छायाचित्र:- वुशू स्पर्धेत राज्य स्तरीय उपविजेतेपद पटकावलेले श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुलांचे व मुलींचे संघ प्राचार्य गजानन मांद्रेकर, क्रीडा शिक्षक अभय सावंत व ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा पै पाणंदीकर यांच्या समवेत.)
गोवा शासनाच्या क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने आयोजित केलेल्या एकोणीस वर्षांखालील राज्य स्तरीय वुशू स्पर्धेत गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी व मुलींनी

.
[ays_slider id=1]