स्वर गंधार कला केंद्र – नास्नोळा तर्फे रविवार दिनांक ०२ एप्रिल २०२३ रोजी ४थी “ स्वर गंधार संगीत सभा “ आयोजित

.

स्वर गंधार कला केंद्र – नास्नोळा तर्फे रविवार दिनांक ०२ एप्रिल २०२३ रोजी
४थी “ स्वर गंधार संगीत सभा “ आयोजित केली होती

प्रमुख पाहुणे म्हणुन गायन विषयात ‘संगीत विशारद’ पदवी प्राप्त श्री विश्वास गावकर हजर होते

संस्थेचे सचिव श्री दिलीप म्हालदार यांनी सर्वांचे स्वागत केले व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

स्वर गंधार कला केंद्राच्या शिष्य मंडळाने स्वागत गीत सादर केले त्यास हार्मोनियम साथ: श्री समीर च्यारी आणि तबला साथ : कु. क्रिशय गोपिकांत शिरोडकर यांनी केली.

गायन : सौ प्रिती गोपिकांत शिरोडकर (राग – भीमपलासी) सरगम गीत, बंदिश व ताल चौताल मध्ये धृपद गायन सादर केले
सौ मंगला उल्हास हळदोणकर (राग भुप) सरगम गीत व बंदिश
सौ रेणु राजन तुवेंकर (राग – भागेश्री ) सरगम गीत, बंदिश व सुंदर अशी ‘बरसन लागी बदरिया’ ही कजरी सादर केली
साथी कलाकार:
हार्मोनियम साथ: श्री समीर च्यारी
तबला साथ: श्री ह्रिषीकेष पांचाळ

हार्मोनियम सह वादन (राग भूप ) कु. गेशना गोविंद गोवेकर व कु. आचल अशोक वायगणकर यांनी केले त्यांना तबला साथ कुमार प्रियांशु अशोक घाडी याने केली.

खास आमंत्रित कलाकार श्री नकुल दत्ताराम वेंजी याने ताल तीनताल मध्ये तबला एकल वादन सादर केले
त्यांना श्री ह्रिषीकेष पांचाळ यांनी लेहेरा साथ केली

कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे श्री विश्वास गावकर यांनी भैरवी सादर केली
श्री शैलेश पाळणी तबला , समीर च्यारी हार्मोनियम आणि श्री देवेंद्र मावळणकर यांनी मंजिरी साथ केली.

श्री देविदास नेतार्डेकर यांनी सूत्र संचालन तर श्री ब्रिजेश शिरोडकर यांनी ध्वनी संकलन केले
संस्थेचे अध्यक्ष श्री गोपिकांत शिरोडकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar