युवकांना जायंट्स गृप मध्ये सहभागी करून ध्या जेणेकरून जायंट्स गृप संघटना मजबूत व सक्षम होण्यासाठी मदत होईल असे उदगार भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे

.
म्हापसा वाताहार
युवकांना जायंट्स गृप मध्ये सहभागी करून ध्या जेणेकरून जायंट्स गृप संघटना मजबूत व सक्षम होण्यासाठी मदत होईल असे उदगार भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पर्वरी येथे जायंट्स गृप ऑफ पर्वरी व जायंट्स गृप ऑफ पर्वरी सहेलीचा अधिकार ग्रहण प्रसंगी बोलताना काढले.
जायंट्स गृप ऑफ पर्वरी व जायंट्स गृप ऑफ सहेली च्या शपथ ग्रहण कार्यक्रमात ते प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर केद्रीय कमिटी सदस्य संदीप नाडकर्णी, फेडरेशन दहा चे अध्यक्ष उमेश नाईक, वर्षा नायक, जायंट्स गृप ऑफ पर्वरी चे नुतन अध्यक्ष गजानन तळवणेकर, शपथ ग्रहण अधिकारी श्रीपाद येंडे, जायंट्स गृप ऑफ पर्वरी सहेली अध्यक्षा विधिती धुरी, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जायंट्स गृप ऑफ पर्वरी चे नुतन अध्यक्ष गजानन तळवणेकर व पर्वरी सहेली विधिती धुरी तसेच संचालक मंडळ ला शपथ ग्रहण अधिकारी श्रीपाद येंडे यांनी शपथ दिली. यावेळी बोलताना संदीप नाडकर्णी यांनी सांगितले की संघटना सुरू करणे सोपे असते पण ती टिकवून ठेवणे कठीण असते. जायंट्स फेडरेशन दहा चे अध्यक्ष उमेश नाईक यांनी जायंट्स गृप ऑफ पर्वरी व सहेली याना शुभेच्छा दिल्या. नुतन अध्यक्ष गजानन तळवणेकर यांनी आपण सर्वांन  एकच घेऊन व त्यांच्या सहयोगाने जायंट्स गृप चे कार्य पुढे चालू ठेवणार असल्याचे सांगितले. . जायंट्स गृप ऑफ पर्वरी सहेली अध्यक्षा विधिती धुरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक मंडळ २०२३ ची कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष गजानन तळवणेकर, उपाध्यक्ष- चंद्रकांत जाधव, रामदास नाईक, सदस्य _ शामसुंदर मयेकर, सुरेश मांद्रेकर, संचालक_ राजेंद्र चोडणकर, सत्येंद्रनाथ आसगांवकर, प्रदीप पेडणेकर, सी. नारायण, विठ्ठल भोबे, सहेली अध्यक्षा_ विधिती धुरी, संचालक मंडळ_ प्रज्ञा पेडणेकर, डॉ. स्वाती अणवेकर, वसुंधरा देसाई, स्मिता म्हामल, सुमित्रा नाईक, मंगला भोबे, स्नेहा वळव ईकर, सुहासिनी नारायणन, दिपाली वैणैकर,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूदन नाईक गावकर यांनी केले तर स्मिता म्हामल यांनी आभार मानले.
छाया भारत बेतकेकर
पर्वरी जायंट्स गृप चा अधिकार ग्रहण प्रसंगी गोवा भाजप आणि सदानंद तानावडे, संदीप नाडकर्णी नुतन अध्यक्ष गजानन तळवणेकर विधिती धुरी

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar