बिर्ला इस्टेट्सचे पुण्यातील निवासी स्थावर मालमत्ता बाजारपेठेत पदार्पण; व्यवसायांच्या दृष्टीने मध्यवर्ती

.

बिर्ला इस्टेट्सचे पुण्यातील निवासी स्थावर मालमत्ता बाजारपेठेत पदार्पण; व्यवसायांच्या दृष्टीने मध्यवर्ती भागात ५.७६ एकर जमीन संपादित केली
या जमिनीवर १.५ मिलियन चौरस फुटांपेक्षा जास्त विकासकाम केले जाऊ शकते आणि २५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले जाऊ शकते.
पुणे, ७ एप्रिल, २०२३: सेंच्युरी टेक्स्टाईल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आदित्य बिर्ला समूहातील बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील निवासी स्थावर मालमत्ता बाजारपेठेत प्रवेश केला आहे. बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील व्यावसायिकदृष्ट्या मध्यवर्ती भाग संगमवाडीमध्ये ५.७६ एकर जमीन संपादित केली आहे. ही जमीन त्यांनी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडकडून खरेदी केली आहे. पुण्यातील एका अतिशय प्रीमियम भागात असलेल्या या जमिनीतून जवळपास २५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले जाऊ शकते.
याठिकाणी एक प्रीमियम निवासी प्रकल्प विकसित करण्याची बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडची योजना आहे. आधुनिक जीवनशैलीचे नवे मापदंड रचून, खास निवडण्यात आलेल्या सोयीसुविधांनी सुसज्ज, लाईफडिझाईन्ड स्पेसेस अतिशय विचारपूर्वक निर्माण करणे हे कंपनीचे धोरण असून, पुण्यातील विकासकाम देखील त्या धोरणाला अनुसरूनच केले जाणार आहे.
बिर्ला इस्टेट्सचे एमडी आणि सीईओ श्री. के टी जितेंद्रन म्हणाले, “बृहन्मुंबई महानगर प्रदेश, बंगलोर आणि एनसीआरमध्ये स्वतःची विशेष ओळख निर्माण केल्यानंतर आता पुण्यामध्ये पदार्पण करून बिर्ला इस्टेट्सने एका नव्या टप्प्यामध्ये पाऊल ठेवले आहे. पुणे ही देशातील एक सर्वात मोठी निवासी बाजारपेठ आहे. आम्ही संपादित केलेली जमीन शहराच्या मध्यभागी असल्यामुळे तिची उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता प्रचंड आहे. आमच्या लाईफडिझाईन्ड धोरणाला अनुसरून एक शहरी इकोसिस्टिम याठिकाणी निर्माण करावी, ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या जाव्यात आणि जीवन गुणवत्तेमध्ये वाढ केली जावी हा आमचा उद्देश आहे. पुण्यातील पदार्पण हा आमच्या वृद्धी धोरणाचा तसेच देशातील आघाडीच्या डेव्हलपर्समध्ये स्थान मिळवण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेचा एक प्रमुख भाग आहे.”
सेंच्युरी टेक्स्टाईल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेडमधील एक प्रमुख कंपनी बिर्ला इस्टेट्सचे देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये अनेक प्रकल्प आहेत. मुंबईतील एक प्रीमियम ठिकाण वरळीमध्ये बिर्ला नियारा हा बृहन्मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक विक्री असलेल्या निवासी प्रकल्पांपैकी एक आहे. प्रकल्पाचा शुभारंभ झाल्यापासून एका वर्षभरात २३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री नोंदवण्यात आली आहे.

About Birla Estates:
Birla Estates Private Limited, a 100 per cent wholly owned subsidiary of Century Textiles and Industries Limited is the real estate venture of the Aditya Birla Group. In a short span of time Birla Estates has established itself as a brand of choice in the real estate industry.  Birla Estates develops premium residential housing in key markets. The company is developing land parcels both through outright purchases as well as asset light Joint Ventures apart from developing its own land parcels. In the long term, the company is focused on developing world class residential, commercial and mixed use properties and aims to be amongst the top real estate companies in India. The company’s focus is on differentiating through sustainability, execution excellence, customer centricity and thoughtful design.
The company is headquartered at Mumbai and currently has regional offices in NCR and Bengaluru and also has a well- established commercial portfolio with 2 grade-A commercial buildings located in Worli, Mumbai with ~6 lakh square feet of leasable area.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar