सोनी स्पोर्टस् नेटकर्वकडून यूईएफएसोबत सहयोगामध्ये वाढ आणि युरोपमधील सर्वात मोठी फूटबॉल स्पर्धा यूईएफए युरो २०२४ व युईएफए युरो २०२८ साठी मिळवले विशेष मीडिया अधिकार, टीव्ही व डिजिटल
~ प्रसारकाकडून त्यांच्या फूटबॉल पोर्टफोलिओमध्ये विस्तार आणि अतिरिक्त मार्की फूटबॉल स्पर्धांचे प्रसारण दाखवेल, जसे युरोपियन क्वॉलिफायर्स, इंटरनॅशनल फ्रंडलिझ आणि यूईएफए नेशन्स लीग ~
प्रसिद्धी पत्रक:
मुंबई, एप्रिल ११, २०२३:
भारतातील अग्रगण्य क्रीडा प्रसारक सोनी स्पोर्टस् नेटवर्कने युरोपमधील फूटबॉलची प्रशासकीय संस्था युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (यूईएफए) सोबत सहयोग वाढवला आहे. या कराराचा भाग म्हणून प्रसारकाने २०२२-२०२८ दरम्यान नियोजित सर्व यूईएफए नॅशनल टीम स्पर्धांचे विशेष मीडिया अधिकार प्राप्त केले आहेत आणि यूईएफए युरो २०२४ व २०२८, तसेच त्यांचे युरोपियन क्वॉलिफायर्स व फ्रेण्डली सामन्यांचे प्रसारण करतील. यूईएफए स्पर्धा भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, भूतान, नेपाळ, मालदीव आणि श्रीलंका यांसह भारतीय उपखंडातील दोन्ही लिनीयर टेलिव्हिजनवर पाहता येतील, तसेच त्यांच्या मागणीनुसार ओटीटी प्लॅटफॉर्म सोनीलिव्हवर लाइव्ह स्ट्रिमिंग असेल.
सोनी स्पोर्टस् नेटवर्क यूईएफए युरो २०२४ चे थेट प्रक्षेपण करेल. ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय फूटबॉल स्पर्धा आहे, ज्यामध्ये युरोपमधील सर्व शीर्ष राष्ट्रीय संघांचा समावेश असतो. बहुप्रतिक्षित मार्की टूर्नामेंट १४ जून २०२४ रोजी सुरू होईल आणि जर्मनीमध्ये आयोजित केली जाईल, ज्याचा अंतिम सामना १४ जुलै रोजी बर्लिनच्या ऑलिम्पियास्टॅडियनमध्ये होणार आहे. यूईएफए युरो २०२४ करिता पात्र होण्यासाठी संघांनी युरोपियन क्वॉलिफायर्समधून जाणे आवश्यक आहे, जे मार्च २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत प्ले-ऑफसह होतील. राउंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये दहा गटातील ५३ संघांमध्ये पात्रता फेरी खेळली जाईल आणि सोनी स्पोर्टस् नेटवर्कवर थेट प्रक्षेपणही केले जाईल.
सोनी स्पोर्टस् नेटवर्क यूईएफए नेशन्स लीगच्या सर्व सामन्यांचे प्रसारण देखील करेल. स्पर्धेची अंतिम प्रक्रिया यूईएफए नेशन्स लीग फायनल्स २०२३ १४ जून २०२३ पासून नेदरलँड, क्रोएशिया, स्पेन आणि इटली यांच्यात सुरू होईल.
सहा वर्षांच्या कराराचा भाग म्हणून प्रसारक त्याच्या चॅनेलवर १३०० फूटबॉल सामन्यांचे प्रसारण करेल. नेटवर्क २०२४ व २०२८ युरोपियन क्वॉलिफार्स आणि आगामी यूईएफए युरोच्या दोन एडिशन्सचे प्रसारण करेल. याव्यतिरिक्त फूटबॉल चाहते यूईएफए नेशन्स लीग २०२४ व २०२६ च्या सर्व खेळांचे, तसेच २०२५ व २०२७ मधील यूईएफए नेशन्स लीग फायनलचे थेट प्रक्षेपण पाहू शकतील. तसेच सोनी स्पोर्टस् नेटवर्क यूईएफए चॅम्पियन्स लीग, यूईएफए युरोप लीग, यूईएफए युरोप कॉन्फरन्स लीग, बंडेस्लिगा, एमिरेट्स एफए कप अशा स्पर्धांची अधिकृत प्रसारक आहे.
मते:
राजेश कौल, प्रमुख महसूल अधिकारी – वितरण व आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि क्रीडा व्यवसायाचे प्रमुख, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया:
‘‘आम्हाला जाहीर करताना आनंद होत आहे की, सोनी स्पोर्टस् नेटवर्कने यूईएफएसोबतचा सहयोग वाढवला आहे आणि यूईएफए युरो २०२४ व २०२८ एडिशन्ससाठी अधिकार मिळवले आहेत. ज्यामुळे अधिक प्रमाणात प्रिमिअम दर्जाचे फूटबॉल सादर करण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. भारतीय उपखंडातील विशेष टेलिव्हिजन व डिजिटल अधिकारांच्या संपादनासह आम्हाला प्रेक्षकांसाठी विविध भाषांमध्ये स्पर्धेचे प्रसारण करण्याचा आनंद होत आहे, ज्यामुळे चाहत्यांना फूटबॉलमधील सर्वात मोठ्या इव्हेण्ट्सचा रोमांच अनुभव मिळण्याची खात्री मिळते. यूईएफएमध्ये काही सर्वात प्रिमिअम फूटबॉल प्रॉपर्टीज आहेत आणि हा सहयोग अतिरिक्त १३०० फूटबॉल सामन्यांसह आमचा फूटबॉल पोर्टफोलिओ विस्तारित करतो, ज्यामुळे आम्ही भारतातील युरोपियन फूटबॉलसाठी प्रमुख गंतव्य बनलो आहोत.
मार्की यूईएफए युरो स्पर्धेसाठी उच्च मागणी आहे, ज्यामध्ये अव्वल युरोपियन फूटबॉल संघांसह भारतातील जाहिरातदार व प्रेक्षकांचा समावेश आहे. आणि हे सोनी स्पोर्टस् नेटवर्कवरील यूईएफए युरो २०२० च्या यशस्वी प्रसारणासह दिसून आले, जेथे दर्शकत्व युईएफए युरो २०१६ च्या तुलनेत तिप्पटीहून अधिक होते. तसेच आमच्या लिनियर व डिजिटल व्याससपीठांवरील प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आमच्या नेटवर्कसोबत ६५ हून अधिक ब्रॅण्ड्सनी सहयोग केला होता.’’
गाय-लॉरेण्ट एपस्टीन, मार्केटिंगचे संचालक, यूईएफए
‘‘आम्हाला २०२८ पर्यंत भारतीय उपखंडातील यूईएफए नॅशनल टीम फूटबॉलचे होम म्हणून सोनी स्पोर्टस् नेटवर्कसोबत आमचा सहयोग सुरू ठेवण्याचा आनंद होत आहे. प्रदेशामधील चाहत्यांना यूईएफएच्या युरोपियन नॅशनल टीम फूटबॉल पोर्टफोलिओचे व्यापक व सर्वोत्तम कव्हरेज पाहायला मिळेल, ज्यामध्ये युरोपयिन क्वॉलिफायर्स, यूईएफए नेशन्स लीग, यूईएफए युरो २०२४ आणि यूईएफए युरो २०२८ यांचा समावेश असहे. तसेच सर्व सामन्यांचे थेट प्रसारण लिनियर टेलिव्हिजन व डिजिटल व्यासपीठ सोनीलिव्हवर पाहता येईल.’’
सोनी स्पोर्टस् नेटकर्वकडून यूईएफएसोबत सहयोगामध्ये वाढ आणि युरोपमधील सर्वात मोठी फूटबॉल स्पर्धा यूईएफए युरो २०२४ व युईएफए युरो २०२८ साठी मिळवले विशेष मीडिया अधिकार, टीव्ही व डिजिटल
.
[ays_slider id=1]