यू ट्रेड सोल्यूशन्सचा अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म- यू ट्रेड अल्गोजबिटा आता लाईव्ह
काळाच्या कसोटीवर उतरलेल्या सहाय्यक इक्विटी गुंतवणुकीला चालना देणे प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट
गोवा, ११ एप्रिल २०२३: एक प्रमुख जागतिक फिनटेक कंपनी यू ट्रेड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने गोव्यामध्ये अल्गोरीदम या त्यांच्या प्रमुख कार्यक्रमात किरकोळ गुंतवणूकदारांसाठी नाविन्यपूर्ण अल्गोरिदमिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म यू ट्रेड अल्गोजबिटा सादर केले. शेअर बाजार ट्रेडर्स आणि इक्विटी मार्केट तज्ञांसाठी उत्तम अशा अल्गोरीदम कार्यक्रमात गोव्यातील १०० पेक्षा जास्त ट्रेडर्स सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत आणि आयपीएस- डिजिपी श्री. जसपाल सिंग उपस्थित होते.
यू ट्रेड सोल्युशन्सचे सह-संस्थापक श्री. कुणाल नंदवानी म्हणाले, “यू ट्रेड अल्गोचे बीटा लाँच हे किरकोळ गुंतवणूकदारांना स्टॉक मार्केट गुंतवणुकीचे सहाय्य पुरविण्यासाठी यू ट्रेड सोल्युशन्सकरता एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे व्यासपीठ गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सना अंगभूत आणि आधी चाचणी केलेल्या गुंतवणुकीची धोरणेयांच्यामध्ये निवड करण्यासाठी अॅक्सेस देईल. यू ट्रेड अल्गोज गुंतवणुकीच्या पारंपारिक मार्गांसाठी एक व्यवहार्य पर्याय सादर करते, तसेच ट्रेडर्सना व्यापारांचे नियोजन, रणनीती आणि स्वयंचलन करण्यासाठी सहाय्य करते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सहाय्यक इक्विटी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हे प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आहे.”
यू ट्रेड अल्गोस ट्रेडर्सना त्यांच्या जोखीम प्रोफाइलनुसार धोरणे ठरवण्याची आणि निवडण्याची अनुमती देते. सदस्यत्व घेण्यापूर्वीही ते ट्रेडर्सना मागील तीन वर्षांच्या डेटाची बॅक टेस्टिंग करण्यास अनुमती देते. यामुळे ट्रेडर्स माहितीपूर्ण गुंतवणुकीचे निर्णय घेण्यास सक्षम होतात. जेणेकरुन त्याने किंवा तिने विशिष्ट पूर्णपणे स्वयंचलित अल्गो आधारित ट्रेडिंग लागू केले असल्यास ते आर्थिक परताव्याचे वास्तविक वेळेचे मूल्यांकन करू शकतात.
इक्विटी गुंतवणुकीशी संबंधित काही गुंतागुंत दूर करणे हे यू ट्रेड अल्गोसचे उद्दिष्ट आहे. प्रगत एआय अल्गोरिदमद्वारे समर्थित अल्गो ट्रेडिंगचा त्याचा दृष्टीकोन गुंतागुंतीच्या आर्थिक जगात सहजतेने दिशादर्शन करण्यासाठी आवश्यक साधने आणि संसाधने पुरविते. यू ट्रेड सोल्युशन्स अल्गोरीदम येथे हे नाविन्यपूर्ण अॅप सादर करण्यास आणि वापरकर्त्यांना डेटा-आधारित निर्णय घेण्यास, त्यांच्या गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवण्यास आणि त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास सक्षम करण्यासाठी उत्सुक आहे.
यू ट्रेड सोल्युशन्स अल्गो ट्रेडिंग क्षेत्रामध्ये सर्वोत्तम उपाय प्रदान करण्यात समृद्ध कौशल्य आणत आहे. भविष्यातील विकास योजनांचा भाग म्हणून देशातील आर्थिक गुंतवणुकीत बदल घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधावा:
श्री. अमित दळवी
अॅडफॅक्टर्स पीआर
9892417582
amit.dalvi@adfactorspr.com