फळदेसाईंतर्फे भाजप स्थापना दिवस साजरा

.

फळदेसाईंतर्फे भाजप स्थापना दिवस साजरा
पणजी ः भाजपचा भाग असलेले कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी भारतीय जनता पक्षाचा 44वा स्थापना दिवस (फाउंडेशन डे) विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या अनुसूचित जातींमधील महिलांचा आपल्या मतदारसंघामधील विविध कार्यक्रमात गौरव केला.
फळदेसाई यांनी खोर्ली आरोग्य केंद्रात फळांचे वितरण देखील केले. यावेळी कुंभारजुवा भाजप अध्यक्ष चंदन वरगावकर, भाजपचे कुंभारजुवा प्रभारकी गिरीश उसकईकर उपस्थित होते.
यानिमित्त बोलताना आमदार फळदेसाई यांनी सरकारच्या विविध योजनांचा विशेषकरून सामाजिक क्षेत्रासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. योजनांचे प्रलंबित असलेले अर्ज तसेच लाभार्थ्यांची प्रलंबित असलेली रक्कम देण्यासंबंधी सरकारशी बोलणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांप्रमाणे मतदारसंघातील अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वास त्यांनी दिले.
मागील अधिवेशन सत्रात चर्चेवेळी फळदेसाई यांनी आपल्या मतदारसंघातील विविध स्तरावरील सुधारणांसाठी अनुदानची मागणी केली होती. आता सत्ताधारी पक्षात असल्याने या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यामध्ये प्रामुख्याने बेटांवरील गावांचा समावेश असून या भागांतील आरोग्य सेवेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करून त्यांना आपत्कालात फेरी सेवेवर निर्भर रहावे लागणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. फेरी सेवा सुधारणा तसेच पूर न येण्यासाठी किनारी तसेच अन्य भागांत आवश्यक कामे करण्यात येणार असल्याचे फळदेसाई यांनी म्हटले आहे. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, खोर्लीचे सरपंच लुसियानो बाप्तिस्टा परेरा आदी मान्यवरदेखील उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar