म्हापशातील नवीन बस स्थानकाच्या शेतजमिनीत नेपाळी तरुणाचा खून

.

म्हापशातील नवीन बस स्थानकाच्या शेतजमिनीत नेपाळी तरुणाचा खून
म्हापसा (न. प्र.) : म्हापसा येथील नवीन बसस्थानकाच्या बाजूला खुल्या शेतजमिनीत एका ३३ वर्षीय नेपाळी तरुणाचा मृतदेह सापडला. हा युवक बार्देश मधील सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एका कंपनीचा कर्मचारी होता.त्याचा खून झाल्याचा संशय म्हापसा पोलिसांनी व्यक्त केला आहे. नबीन बी. के असे या मृताचे नाव आहे. नबीनच्या गळ्यावर काचेची बाटली खुपसल्याने त्याचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, ही घटना १५ रोजी दुपारी ३च्या सुमारास उघडकीस आली. एक मृतदेह या खुल्या शेतात पडल्याची माहिती पोलिसांना मिळताच लागलीच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गळ्यावर काचेची बाटली खुपसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने नबीनचा मृत पावला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान नबीनच्या गळ्यात काचेचा तुकडा अडकल्याने मोठी जखम झालेली दिसत होती. त्याशिवाय पोलिसांना मृतदेहाच्या बाजूला एक काचेची दारूची बाटली फोडलेली व बाटलीच्या काचा विखुरलेल्या सापडल्या.पुढील तपास म्हापसा पोलीस निरीक्षक परेश नाईक करीत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar